कच्च्या रस्त्यांवर धावण्याची उत्कृष्ट क्षमता व आयकॉनिक डिझाईन यांचा अनोखा संयोग
मुंबई, 16ऑगस्ट : 19.4 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील प्रमुख कंपनी असलेल्या ‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’तर्फे ‘थर’ या नव्या रुपातील ‘एसयूव्ही’चे अनावरण आज, देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनी, करण्यात आले. कार्यक्षमता, दररोजच्या प्रवासासाठी आवश्यक असणारा आरामदायीपणा व सुटसुटीतपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षितता या सर्व बाबतीत नव्या रुपातील ‘थर’ने मोठी झेप घेतली आहे. कच्च्या रस्त्यांवरही दमदारपणे वाटचाल करण्याची क्षमता आणि आयकॉनिक डिझाईन यांबाबत या वाहनामध्ये कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही.
नव्या थरचे अनावरण करताना ‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन गोयंका म्हणाले, ‘’सर्वथा नव्या रुपातील ‘थर’चे अनावरण करून आज आम्ही पुन्हा इतिहास लिहिला आहे. ‘थर’ या गाडीत आमच्या वाहन क्षेत्रातील समृद्ध वारसा रुजलेला आहे आणि महिंद्राच्या गुणसूत्रांची ती शुद्ध अभिव्यक्ती आहे. आमच्या ‘एसयूव्ही’च्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे. 1950 सालापासून आपल्या सैन्य दलांची सेवा करीत देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास या एसयूव्ही कायम सज्ज असतात. त्याचवेळी, साहस व जीवनशैली यांचे प्रतीक म्हणूनही त्या दिमाखात वावरतात. नवी ‘थर’ ही मजा, स्वातंत्र्य यांची अभिव्यक्ती करते. नव्या साहसी प्रवासांसाठी ती अगदी सुसज्ज आहे.’’
‘थर’च्या पारंपरिक चाहत्यांना ही नवीन गाडी आकर्षित करीलच, त्याशिवाय ‘थर’ आपल्या मालकीची असावी, अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वांना ती आनंद देईल.
नवीन ‘थर’मध्ये खालील रोमांचक वैशिष्ट्ये आहेत:
- नवीन ‘बीएस-सिक्स’ अनुरूप इंजिनांचे पर्याय – ‘0 लिटर एमस्टॅलियन टीजीडीआय पेट्रोल इंजिन’ आणि ‘2.2 लिटर एमहॉक डिझेल इंजिन.’
- नवीन गिअरबॉक्सचा पर्याय – ‘6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर’ स्वयंचलित ट्रान्समिशन आणि ‘6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन’, ‘ऑथेंटिक मॅन्युअल शिफ्ट-ऑन-फ्लाय 4-बाय-4 ट्रान्सफर केस’शी सहज जुळणारे.
- नवीन छताचे पर्याय – ‘हार्ड टॉप’, तसेच या श्रेणीत प्रथमच सादर होणारे परिवर्तनीय टॉप आणि एक पर्यायी ‘सॉफ्ट टॉप’
- सर्वथा नवीन आसनांचे पर्यायः ‘4 फ्रंट-फेसिंग सीट’ आणि ‘2+4 साइड-फेसिंग सीट’
- नवीन तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये – ‘ड्रिझल रेझिस्टंट 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम’, ‘क्रूझ कंट्रोल’, ‘अॅडव्हेंचर स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले’ आणि बरेच काही.
- नवीन आरामदायी व सुटसुटीतपणाची वैशिष्ट्ये – ‘स्पोर्टी फ्रंट सीट’, छतावर बसवलेले स्पीकर्स आणि इतर काही.
- नवीन सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये – ‘एबीएस + ईबीडी’, ‘ड्युअल एअरबॅग्ज’, ‘इपीएस विथ रोलओव्हर मिटिगेशन’, ‘हिल-होल्ड’ व ‘हिल डिसेंट कंट्रोल’ आणि बरेच काही.
‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’चे ‘ऑटो अँड फार्म सेक्टर्स’चे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांच्या मते, “संपूर्णपणे नवीन असलेली ही ‘थर’ तिच्या ब्रॅंडचे मूल्य वाढविणार आहे. तिच्या पूर्वीच्या चाहत्यांनाच नव्हे, तर नवीन ग्राहकांनाही ती आकर्षित करेल. त्यातून तिच्या ग्राहकांची संख्या आणखी वाढेल. असाधारण स्वरुपाचा प्रवास करणाऱ्या आणि अशक्य ते शक्य करण्याची इच्छा असणाऱ्यांना ही गाडी आवडेल अशीच आहे. नवीन ‘थर’ हे वाहन येत्या 2 ऑक्टोबर 2020 रोजी बाजारात सादर करण्यात येईल. राष्ट्रपिता म. गांधी यांचा जयंतीदिन असल्याने हा दिवसही महत्त्वाचाच आहे.’’
‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’चे ‘ऑटोमोटिव्ह डिव्हिजन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाक्रा म्हणाले, “थर’ने यापूर्वीही स्वातंत्र्य, रोमांच आणि चालविण्यातील मजा ही वैशिष्ट्ये जोपासली आहेत. इतर काही मोजक्याच वाहनांमध्ये ती असू शकतील. नवीन ‘थर’च्या माध्यमातून या वारशाचे संरक्षण करण्याचे आमचे कार्य चालूच आहे. डांबरी आणि कच्च्या या दोन्ही रस्त्यांवर उत्कृष्टपणे धावणारी, तसेच प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट सुरक्षा आणि दररोजच्या प्रवासातील आराम ही वैशिष्ट्ये असणारी ही गाडी अगदी खरी, आधुनिक एसयूव्ही चालविण्याचा आनंद निश्चितच देईल.”
भारत स्वतंत्र झाल्यापासून, ‘महिंद्रा क्लासिक्स’ ने भारतीयांना नवीन जग शोधण्यास आणि सर्वात आव्हानात्मक प्रदेशांवरही विजय मिळविण्यास सक्षम केले आहे. गेल्या तब्बल सात दशकांहून अधिक काळ, ‘महिंद्रा क्लासिक्स’ने भारताच्या प्रगतीस हातभार लावला आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी नवीन थरचे अनावरण करून हा प्रवास पुढे नेण्यात येत आहे.
राल्फ वाल्डो इमर्सन या प्रख्यात कवीने म्हटल्याप्रमाणे, “जेथे वाट जाईल तेथे जाऊ नका; जिथे कोणताही मार्ग नाही तेथे जा आणि तुमचा ठसा उमटवा.” नवीन ‘थर’ चालवून आपल्याला हे करता येते.
डिझाइन व अभियांत्रिकी या गोष्टी भारतात केलेली नवीन ‘थर’ महिंद्राच्या नाशिक येथील कारखान्यात उत्पादित होत आहे. ‘रेड रेज’, ‘मिस्टिक कॉपर’, ‘नेपोली ब्लॅक’, अॅ’क्वामरिन’,’ गॅलेक्सी ग्रे’ आणि ‘रॉकी बेज’ या सहा आकर्षक रंगांमध्ये ती उपलब्ध असेल.
वेबसाईट / सोशल मीडिया हॅंडल्स / हॅशटॅग्ज :
वेबसाईट – www.auto.mahindra.com/suv/thar
फेसबुक: www.facebook.com/mahindrathar
ट्विटर: www.twitter.com/mahindra_thar
इन्स्टाग्राम: www.instagram.com/mahindrathar
यूट्यूब: www.youtube.com/tharmahindra
हॅशटॅग्ज:
#TheAllNewThar
#BornAgain
#ExploreTheImpossible
#BornAgain
नवीन ‘थर’विषयी
‘आयकॉनिक डिझाइन’ची उत्क्रांती
नवीन ‘थर’मध्ये दोन दरवाजांचे वैशिष्ट्य कायम ठेवण्यात आले आहे. मात्र त्यातही समकालीन डिझाईनचा स्पर्श राहील याची काळजी घेण्यात आली आहे. विस्तीर्ण, उत्तम प्रकारे संतुलित आणि ‘हार्ड टॉप’ किंवा ‘कन्व्हर्टेबल रूफ-टॉप’ या प्रकारांत उपलब्ध असणारी ‘थर’ कुठेही गेली, तरी सर्वांचे लक्ष वेधून घेते.
या गाडीच्या अंतर्गत भागाचे डिझाईनदेखील अनोख्या स्वरुपाचे आहे. ‘थर’च्या गुणसूत्रांचा अविभाज्य भाग असलेली ‘कमांडिंग ड्रायव्हिंग पोझिशन’ टिकवून ठेवताना, नव्या ‘थर’मध्ये संपूर्णपणे नव्याने डिझाइन केलेला अंतर्भाग आहे. ‘थर’च्या बाहेरील मजबूत, ‘रेट्रो-स्टाईल’ यातून प्रतिबिंबित होते.
- आयकॉनिक डिझाइन
- दिवसाही लागणारे एलईडी दिवे
- ड्युअल टोन बम्पर
- एलईडी टेल लॅम्प
- 72 सेमी (आर 18) डीप सिल्व्हर अलॉय चाके
- तीन प्रकारच्या छतांचे पर्याय – ‘हार्ड टॉप’, या श्रेणीत प्रथमच सादर होणारे ‘मॅन्युअल कन्व्हर्टिबल टॉप’ आणि ‘फिक्स्ड सॉफ्ट टॉप’
- पुढील भागातील ‘फॉग लॅम्प’
- चंदेरी छटांसह संपूर्ण काळ्या रंगातील अंतर्गत सजावट
- एसी व्हेंट्स आणि ‘सेंटर बेझल’च्या सभोवताली ‘फॉक्स कार्बन-फायबर’चे डिटेलिंग.
श्वास रोखून धरायला लावणारी कार्यक्षमता
नवीन ‘थर’मध्ये दोन नव्या इंजिनांची शक्ती आहे. कार्यक्षमता, सूक्ष्मता आणि विश्वसनीयता यांच्या बाबतीत ही इंजिने मापदंड ठरतात. नवीन ‘थर’मध्ये 2.0 लिटरचे ‘एमस्टॅलियन टीजीडीआय’ पेट्रोल इंजिन आणि 2.2 लि. ‘एमहॉक’ डिझेल इंजिन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ‘थर’च्या श्रेणीमध्ये आणि एकुणातच महिंद्राच्या गाड्यांमध्ये प्रथमच या इंजिनांचा उपयोग करण्यात आला आहे. ‘सिक्स-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन’ किंवा ‘सिक्स-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर’ स्वयंचलित ट्रान्समिशन असे दोन पर्याय यात मिळतात. ‘ऑथेंटिक 4×4 मॅन्युअल शिफ्ट ट्रान्सफर केस’ही यासोबत मिळते.
- नवीन ‘एमस्टॅलियन टीजीडीआय’ पेट्रोल इंजिन – 150 बीएचपी शक्ती व 320 एनएम टॉर्कसाठी
- नवीन ‘एमहॉक सीआरडीइ’ डिझेल इंजिन – 130 बीएचपी शक्ती व 320 एनएम टॉर्कसाठी
- ‘6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन’ आणि ‘6-स्पीड स्वयंचलित ट्रान्समिशन’ हे पर्याय
- ‘शिफ्ट-ऑन-फ्लाय 4×4 मॅन्युअल शिफ्ट ट्रान्सफर केस’ , ‘लो क्रॉल रेशो’सह
कच्च्या रस्त्यावरून दणदणीतपणे व डांबरी रस्त्यावरून सुरळीतपणे वाहन चालविण्याचा अनुभव
खडबडीत रस्त्यांवर जाण्यासाठी दणकट वाहनेच हवीत. म्हणूनच नवीन ‘थर एसयूव्ही’ ही अतिशय दणकट अशा ‘थर्ड जनरेशन चॅसिस’वर बांधण्यात आली आहे. भारतातील आणि जगातील काही सर्वात खडबडीत पृष्ठभागांवर तिची कठोरपणे चाचणी घेण्यात आली. या गाडीत एक नवीन प्रकारची ‘सस्पेंशन’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे अशक्यप्राय अशा खडबडीत जमिनीवरूनही गी गाडी सहजपणे जाते, तसेच डांबरी रस्त्यावरून वेगाने जाताना ती व्यवस्थित हाताळता येते. नव्या ‘थर’मध्ये खडबडीत रस्त्यावरून धावताना टिकून राहतील, असे कणखर स्वरुपाचे भाग बसवलेले आहेत. त्यामुळे या गाडीचा चालक त्याला हव्या तशा पद्धतीने, कोठूनही, कशीही ही गाडी चालवू शकतो.
- ‘ऑथेंटिक बॉडी-ऑन-फ्रेम कन्स्ट्रक्शन’ – खऱ्या एसयूव्हीचे लक्षण
- स्वतंत्र फ्रंट सस्पेंशन आणि ‘मल्टी-लिंक रियर सस्पेंशन सेटअप’
- ‘शिफ्ट-ऑन-फ्लाय 4×4 मॅन्युअल शिफ्ट ट्रान्सफर केस’, ‘लो रेशो’सह
- मागील अॅक्सलवर ‘मॅकेनिकल लॉकिंग डिफरन्शिअल’
- या श्रेणीतील पहिलेच ‘ब्रेक लॉकिंग डिफरन्शिअल’
- क्लास रिडींग अॅप्रोच (41.8 अंश). डिपार्चर (36.8 अंश) व रॅम्प ओव्हर (27 अंश) अँगल
- लोड नसलेल्या स्थितीत ‘ग्राउंड क्लियरन्स’ 226 मिमी.
- 650 मिमी खोल पाण्यातून जाण्यास सक्षम
- कोणत्याही पृष्ठभागावरून जाण्यास सक्षम मोठे, अत्याधुनिक टायर, 255/65 आर-18, व्हाईट लेटरिंगसह.
- फर्स्ट-इन-क्लास ‘इलेक्ट्रोमेकॅनिकल ड्राइव्हलाईन डिस्कनेक्ट’
दररोजच्या आरामदायी प्रवासासाठी विविध सुविधा आणि वैशिष्ट्ये
शहरे, महामार्ग किंवा कच्चा, खडबडीत रस्ता या सर्व ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत प्रवास आरामदायी व्हावा व सर्व सोयी-सुविधा तत्क्षणी मिळाव्यात, असे नियोजन करून नवीन ‘थर’चे डिझाईन करण्यात आले आहे. केवळ चालकच नव्हे, तर सर्व प्रवाश्यांसाठी आतील डिझाइन शक्य तितके सुटसुटीत बनविण्यावर यात विशेष लक्ष देण्यात आले आहे.
- ‘स्पोर्टी फ्रंट सीट्स’
- ‘फ्रंट-फेसिंग रीअर सीट’ – निम्म्या-निम्म्या विभागणीसह
- छतामध्ये बसविण्यात आलेले स्पीकर्स
- चालकाचे आसन कमी-अधिक उंच करण्याची, तसेच त्याच्या कमरेला अनुरुप ‘अॅडजस्टमेंट’ करण्याची सोय
- चालकाच्या शेजारच्या आसनावर ‘वन टच टिप’ आणि स्लाइड यंत्रणा
- स्टीयरिंग व्हील तिरके करण्याची सोय
- पॉवर विंडोज
- ‘इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम’
- ‘रिमोट फ्लिप कीसह सेंट्रल लॉकिंग’
तंत्रज्ञानावर भर
या गाडीच्या मालकांची स्पोर्टी आणि साहसी जीवनशैली लक्षात घेऊन, नवीन थरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. यातून चालकांना ते कोठेही असताना प्रत्यक्ष गाडीशी, तसेच सभोवताल व मित्र यांच्याशी जोडलेले राहता येते. या श्रेणीत या सुविधा प्रथमच देण्यात आल्या आहेत.
- ‘अँड्रॉइड ऑटो’, ‘अॅपल कार प्ले’, ‘यूएसबी’, ‘नॅव्हीगेशन’ यांसह 18 सेमी ‘टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम’
- ‘इन्फोटेन्मेंट सिस्टीमवर अॅडव्हेंचर स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले’ – या श्रेणीत प्रथमच
- ‘अॅडव्हेंचर कनेक्ट’: ‘महिंद्रा अॅडव्हेंचर कॅलेंडर डिस्प्ले’ – या श्रेणीत प्रथमच
- ‘ब्लू सेन्स अॅप’सह ‘स्मार्ट वॉच’ आणि ‘फोन कनेक्टिव्हिटी’ – या श्रेणीतील प्रथमच
- ‘इन्स्ट्रुमेंट क्लस्टर’मध्ये ‘टीएफटी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले’
- इ’लेक्ट्रॉनिक एचव्हीएसी कंट्रोल्स’
- ‘ड्रिझल रेझिस्टंट’ (आयपी 54 मानक) डॅशबोर्ड स्विचेस
- ‘टायरेट्रोनिक्स’: टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम – या श्रेणीत प्रथमच
- ‘टायर डायरेक्शन मॉनिटरिंग सिस्टम’ – या श्रेणीत प्रथमच
- ‘क्रूझ कंट्रोल’
- स्टीयरिंगवर बसवलेले ऑडिओ व फोनचे नियंत्रण
उत्कृष्ट सुरक्षा मानके
अशक्य कोटीतील साहसे करताना, शक्य तितके सुरक्षित राहणे चांगले. म्हणूनच सर्व प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी थर ही गाडी उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
- क्रॅश न होण्याजोगे बॉडीशेल
- ‘रोलओव्हर मिटिगेशन’सह ‘इएसपी’ – या श्रेणीत प्रथमच
- सर्व प्रवाश्यांसाठी ‘3-पॉईंट सीट बेल्टसह बिल्ट-इन रोल-केज’ – या श्रेणीत प्रथमच
- ‘ड्युअल एअरबॅग्ज’ आणि ‘एबीएस’
- ‘हिल होल्ड’ व ‘हिल डिसेंट कंट्रोल’ – या श्रेणीत प्रथमच
- ‘आयसोफिक्स चाईल्ड सीट माउंट्स’ – या श्रेणीत प्रथमच
- ‘इंटेलिपार्क’: मागील पार्किंग सेन्सर्स