मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राच्या ट्रॅक्टर्सची जानेवारी महिन्यात विक्रमी विक्री झाली. स्थानिक बाजारपेठा आणि निर्यात मिळूण १५,९९० ट्रॅक्टर्सची विक्री या महिन्यात झाली. कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफईएस)ने जानेवारी २०१७ मध्ये भरघोस विक्री झाल्याची घोषणा आज केली.
एफईएसच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१७ मध्ये स्थनिक पातळीवर १४,७७६ ट्रॅक्टर्स विक्री झाली. जानेवारी २०१६ मध्ये हा आकडा १४, ४०२ युनिट्स इतका होता.
कंपनीचे शेती साधने आणि दुचाकी विभाग अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी राजेश जेजुरीकर म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा ६ टक्क्यांची वाढ झालीआहे. येत्या रग्बी हंगामात यात आणखी सकारात्मक वाढ होईल. स्थानिक बाजारपेठा आणि निर्यात मिळून अनुक्रमे १४,७७६ आणि १,१३३ ट्रॅक्टरची विक्री झाली आहे.