- उद्योगक्षेत्रात पहिल्यांदाच तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांसाठी संपर्क विरहीत सेवा अनुभव
- कडक सुरक्षा प्रक्रियेअंतर्गत निवडक दालने व वर्कशॉप्समध्ये कामाला सुरुवात
मुंबई, 14 मे : 20.7 अब्जांच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. ने (एम अँड एम लि.) सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार आज देशभरातील काही डीलरशीप्स आणि कार्यशाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहन मालकांसाठी ‘संपर्कविरहीत सेवा अनुभव’ जाहीर केला आहे. महिंद्रा आतापर्यंत बऱ्याच सेवा पहिल्यांदाच दिल्या असून कंपनी वाहन खरेदी आणि मालकी अनुभवाचे डिजिटायझेशन करण्याच्याबाबतही आघाडीवर राहिली आहे.
कंपनीने नियमांचे कडक पालन करत ग्राहक तसेच वितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देता निवडक डीलरशीप्सकडे विक्री आणि सेवा कामकाज सुरू केले आहे. आपल्या घरीच राहून गाडीचे सर्व्हिसिंग करून घेऊ इच्छिणारे ग्राहक असो किंवा महिंद्राच्या वर्कशॉपला भेट देऊन गाडी सर्व्हिसिंग करून घेण्यास पसंती देणारे ग्राहक असोत, कंपनी सर्वांच्याच सुरक्षेसाठी शक्य त्या सर्व उपाययोजना अमलात आणत आहे.
एम अँड एम लि. च्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाक्रा म्हणाले, ‘ओन ऑनलाइन’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केल्यानंतर आम्ही पूर्णपणे ‘संपर्कविरहीत’ सेवाही लाँच केली आहे, ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना संपर्कविरहीत आणि सर्वसमावेशक विक्री व सेवा अनुभव देण्यासम मदत होईल. या काळात ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेत त्यांना चांगली सेवा देणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. डिजिटल पातळीवर दिला जाणारा संपर्कविरहीत सेवेचा आमचा अनुभव कंपनीच्या सर्व टचपॉइंट्समधअये लागू करण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना व कडक नियमावलीला पूरक ठरणारा आहे. महिंद्राशी संवाद साधण्याच्या या नव्या पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना आमंत्रित करत आहोत.’
संपर्कविरहीत सेवा अनुभवात पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
- ग्राहकांना त्यांच्या गाडीचे सर्व्हिसिंग करून घेताना आता कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, रोख पैसे किंवा पेमेंट मशिनच्या संपर्कात येणे टाळता येणार आहे.
- दुरुस्तीची सर्व माहिती व नोंदी कंपनीच्या ‘विथ यू हमेशा’ (डब्ल्यूवायएच अप डाउनलोड – http://bit.ly/WYH-APP/With You Hamesha on WhatsApp – https://bit.ly/WYHWA)) या मोबाइल अपवर मिळवता येणार आहे. वाहन मालकांना दुरुस्तीची माहिती, त्यासाठी वापरण्यात आलेल्या सुट्या भागांची, गाडीवर करण्यात आलेल्या एकंदर कामाची माहिती, संबंधित खर्च, आवश्यक परवाने आणि पेमेंट हे सर्व ऑनलाइन पाहाता येणार आहे.
- महिंद्राने भारतात पहिल्यांदाच ग्राहकाने सुचवण्यात आलेल्या दुरुस्तीचे कामकाज थेट सर्व्हिसिंगच्या ठिकाणावरून व्हिडिओ स्ट्रीमिंगद्वारे ‘कस्टमरलाइव्ह’ या सेवेअंतर्गत दाखवणे शक्य केले आहे. गरजेनुसार सेवा सल्लागार ग्राहकासोबत व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतील आणि वर्कशॉपमध्ये गाडीची तपासणी करताना आवश्यक दुरुस्तीची माहिती देतील. त्याचप्रमाणे गाडीच्या खराब झालेल्या सुट्या भागांसाठी सेवा सल्लागार नेहमी वापरल्या जाणाऱ्या सुट्या भागांसाठी थ्रीडी इमेजेसचाही वापर करणार आहेत.
- महिंद्रा ग्राहकांना गाडीच्या सर्व्हिसिंगशी संबंधित कागदपत्रे आणि अद्यावत माहिती सहजपणे व्हॉट्सअपवर (विथ यू हमेशाचे व्हॉट्स अप अकाउंट- 7208071495) मिळवता येणार आहे.
इतर सेवा उपक्रम :
विथ यू हमेशा अपद्वारे वापरकर्त्यांना निवडलेल्या वेळेसाठी सर्व्हिसिंग अपॉइंटमेंट आरक्षित करणे, गाडी सर्व्हिसिंगसाठी घेऊन जाण्याकरता तसेच परत आणून देण्यासाठी पिकअप व ड्रॉप सेवा देण्याची विनंती करता येईल, सर्व्हिसिंगचा खर्च, वाहनाचा इतिहास/आरएसए पुनर्नूतनीकरणाचे तपशील जाणून घेता येईल, लाइव्ह चॅट करता येईल आणि या क्षेत्रात पहिल्यांचा लाँत करण्यात आलेल्या टॉटबॉट या चॅटबॉटमध्ये सहजपणे समस्यांचे निराकरण करून घेता येईल तसेच व्यवहारही पूर्ण करता येतील. महिंद्रा वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाद्वारे सक्रियपणे ग्राहकांशी संवाद साधते, त्यांना दूरस्थ मदत देते, वाहनाच्या देखभालीशी संबंधित टिप्स देते आणि वर्कशॉपमध्ये सुरू असलेल्या कामाची अद्यावत माहिती पुरवते.
महिंद्रा दालने आणि सेवा केंद्रांसाठी सुरक्षा व स्वच्छतेशी संबंधित नियमावली
सध्या महिंद्राने देशभरात 300 कस्टमर टचपॉइंट्स सुरू केले असून त्यांचा कंपनीच्या एकंदर नेटवर्कमध्ये 30 टक्के वाटा आहे.
डिजिटल सुविधांद्वारे सुरक्षा व पारदर्शकता राखण्याच्या उपक्रमाबरोबरच महिंद्राच्या डीलरशीप्समध्ये स्वच्छतेचे विविध नियमही पाळले जात आहेत. कंपनीची सर्व दालने आणि सेवा केंद्रामध्ये सुरक्षिततेच्या सर्व पैलूंची खबरदारी घेतली जात असून डीलरशीप्स आणि दालनांमध्येही प्रवेशद्वारे, स्वागतकक्ष किंवा गाडीचे प्रात्यक्षिक दाखवताना, टेस्ट ड्राइव्ह, पिक- ऑफ/ड्रॉप ऑफ, गाडी पोहोचवणे, पेमेंटचे माध्यम निवडणे अशा ग्राहकाचा संपर्क येऊ शकणाऱ्या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षितता पूर्णपणे पाळली जात आहे.
या नियमावलीमध्ये – ग्राहक व कर्मचाऱ्यांची परिसरात प्रवेश करण्यासाठी तापमान तपासणी, सुरक्षित अंतर राखण्यासाठी पर्यायी पार्किंगचा वापर, मास्क, ग्लोव्हज, हातांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे अशा उपायांचा अवलंब करणे, दुरुस्तीसाठी नेण्यापूर्वी वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे, सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्कशॉपमध्ये पर्यायी सर्व्हिस स्टेशनवर वाहनाची दुरुस्ती करणे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सरकारी संघटनांनी सुचवलेल्या नियमावलीशी सुसंगती राखण्यासाठी ही नियमावली बनवताना पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.