
- अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या आरोग्यसेवा, औषधविक्री, पोलिस दल, सरकारी खाती, प्रसार माध्यमे या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष वित्त योजना
- 66 हजार 500 रुपयांपर्यंतचे लाभ मिळू शकतील अशा आकर्षक सवलती व वित्तपुरवठा योजनांचा वर्षाव
मुंबई, 11 जून : ‘कोविड’च्या साथीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना व काळजीवाहकांना मदत करण्याच्या हेतूने महिंद्रा अॅंड महिंद्रा लि. कंपनीने आपल्या सर्व वाहनांवर विविध प्रकारच्या परवडण्याजोग्या वित्त योजना सादर केल्या आहेत. महिंद्रा अॅंड महिंद्रा लि. ही 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहाचा एक भाग आहे.
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्वच घटकांसाठी वाहन खरेदीच्या वित्त योजना सादर करणारी या उद्योग क्षेत्रातील ही पहिलीच कंपनी ठरली आहे. डॉक्टर, नर्स, निमवैद्यकीय कर्मचारी, सरकारी अधिकारी, पोलिस यांच्याशिवाय पत्रकार व माध्यम प्रतिनिधी, रेल्वे व विमानसेवा कर्मचारी यांचाही समावेश वित्त योजनांमध्ये महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीने केला आहे.
या नवीन वित्त योजनांविषयी बोलताना ‘एमअँडएम लि.’चे ‘ऑटोमोटिव्ह विभागा ‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाकरा म्हणाले, ‘’जगात इतरत्र जशी परिस्थिती आहे, तशीच भारतातही आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणारे सर्व घटक या संकटकाळात आपापल्या क्षेत्रांत जीवापाड कष्ट करीत आहेत आणि देशवासीयांच्या रक्षणाची काळजी घेत आहेत. त्यांचे आभार मानण्याचा हा आमच्या परीने एक प्रयत्न आहे. स्वतःच्या मालकीचे महिंद्राचे वाहन असावे, या त्यांच्या आकांक्षेला आम्ही फुंकर घालीत असून त्याकरीताच अनेक वित्त योजना आम्ही सादर केल्या आहेत.’’
नाकरा पुढे म्हणाले, ‘’कोरोनाविरोधातील लढ्यात आघाडीवर कार्यरत असणाऱ्या एकूण सर्व घटकांचा, उदा., आरोग्यसेवा, औषध विक्री, पोलिस दल, प्रसारमाध्यमे, सरकारी खाती, भाज्या व दुग्ध पदार्थ विक्री या क्षेत्रांतील व्यक्तींचा विचार आम्ही या वित्त योजनांसाठी केलेला आहे.’’
या कोविड योद्ध्यांना या योजनांमधून 66 हजार 500 रुपयांपर्यंतचे लाभ मिळतील. या संदर्भात महिंद्राने विविध वित्तसंस्थांशी हातमिळवणी केलेली आहे. यातील काही योजना पुढीलप्रमाणे –
- आता खरेदी करा, पैसे 2021 मध्ये भरा.
- कर्जाची परतफेड 8 वर्षांमध्ये.
- प्रत्यक्ष किंमतीच्या 100 टक्के कर्जपुरवठा.
- कर्ज घेतल्यापासून परतफेड सुरू करण्यास 90 दिवसांची मुदत.
- ‘बीएस-सिक्स’ श्रेणीचे पिकअप वाहन घेऊन ‘बीएस-फोर’ श्रेणीच्या वाहनाइतकाच इएमआय.
- डॉक्टरांसाठी प्रक्रिया शुल्क 50 टक्के माफ.
या योजना विविध वित्तसंस्थांच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहेत व त्यांचा लाभ घेण्याकरीता ग्राहकांना आपल्या नजीकच्या महिंद्रा वितरकाकडे जावे लागेल.














