पुणे, २२ जून २०२१: महिंद्रा समूहाचा एक भाग असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज त्यांच्या बांधकाम उपकरण व्यवसायाच्या अंतर्गत नवीन BSIVसहित मोटर ग्रेडर महिंद्रा रोड मास्टर जी ९०७५ आणि जी ९५९५ आणि बॅकहो लोडर – महिंद्रा अर्थ मास्टर एसएक्स व्हीएक्स यांच्याजोडीला त्यांची BSIVसह असलेली बांधकाम उपकरणे सादर केली.
यावेळी बोलताना महिंद्रा ट्रक आणि बस आणि बांधकाम उपकरण व्यवसाय प्रमुख जलाज गुप्ता म्हणाले, “बांधकाम उपकरण व्यवसायासाठीचा आमच्या ब्रँडचा उद्देश लक्षात ठेऊन आमच्या ग्राहकांच्या भरभराटीची खातरजमा करत आम्ही आता महिंद्रा अर्थ मास्टर बॅकहो लोडर्सची आमची नवीन BSIV मालिका सादर करत आहोत. आम्ही एक आव्हानात्मक ब्रँड असून आमच्या ग्राहकांना उच्च प्रतीची विश्वासार्हता पुरवत आणि तुलनेने कमी खर्चात सर्वोत्तम उत्पादन सुविधा देऊन त्यांची उत्पादन क्षमता आणि फायदा यांच्यात वाढ करणे हे आमचे ध्येय आहे.”
श्री. गुप्ता पुढे म्हणाले, “बांधकाम उपकरण व्यवसायक्षेत्रासाठी असलेल्या नवीन वायू उत्सर्जन नियमांना अनुसरून आज आम्हांला महिंद्रा रोड मास्टर मोटार ग्रेडर्स साठीही आमची BSIVसहित असलेली मालिका सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. ग्राहकांच्या गरजा व्यवस्थित समजून घेतल्यानंतर या मजबूत आणि विश्वासार्ह उत्पादनांची रचना आणि विकास भारतात करण्यात आला आहे. महिंद्राच्या उत्पादन विकास प्रक्रियेचा तो मापदंड आहे.”
या संपूर्ण एमसीई BSIV मालिकेत मजबूत आयमॅक्स सुविधा असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांची कार्ये अधिक चांगली करता येतील आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संभाव्य, लक्षणसूचक आणि अचूक वेगवान व्यवस्थापन करता येईल. स्वतंत्र सेवा पुरविण्याच्या कंपनीच्या विश्वासाला अनुसरून आम्ही सर्वोत्तम कामगिरी आणि कमी खर्च यांची सांगड घालून त्यायोगे अधिक नफा मिळविण्याची खात्री देत आहोत.
महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट (एमसीई) ही एक सच्ची भारतीय बांधकाम उपकरणे उत्पादक कंपनी आहे, जी वर्ष २०११ पासून भारतीय ग्राहकांच्या गरजांना अनुरूप अशी खास यंत्रे आरेखित आणि उत्पादित करते आहे. एमसीई ही विखुरलेल्या ग्राहकांना मूल्यवर्धन मिळवून देताना अधिकाधिक नफ्याची खात्री देते. बॅकहो लोडर्स, अर्थ मास्टर, मोटर ग्रेडर्स, रोड मास्टर्स (१७ टक्के बाजारपेठीय हिसा) अशा विविध पुरस्कारप्राप्त उत्पादनांची निर्मिती एमसीई करते. सध्या ७००० हून अधिक अर्थ मास्टर आणि सुमारे ७०० रोड मास्टर आपल्या अहोरात्र चालणाऱ्या अत्युच्च कामगिरीद्वारे ग्राहकांना संतुष्ट करत असून परिसर व पर्यावरणात अधिक समृद्धीला चालना देत राष्ट्रबांधणीचे कार्य निष्ठेने करत आहेत.
महिंद्रा अर्थमास्टर BSIV (भारत स्टेज ४) आणि एसएक्स स्मार्ट५० (SX Smart50) ची माहिती
BSIV (भारत स्टेज ४) चा समावेश झाल्यापासून अर्थमास्टरची संपूर्ण श्रेणी ही उत्पादकता आणि वैशिष्ट्ये या दोन्ही मुद्द्यांवर अधिक विस्तृत झालेली आहे. विश्वसनीय अशा ७४ एचपी क्षमतेच्या सीआरआय महिंद्रा इंजिनची शक्ती लाभलेल्या या श्रेणीत बीएस थ्रीच्या तुलनेत १३ टक्के अधिक टॉर्क असून त्यामुळे महिंद्राची भारवहन कार्यक्षमता आणखी सुधारलेली आहे. अधिक जास्त कामकाज हाताळण्याची क्षमता आणि अन्य कित्येक सुधारणा असलेल्या सुधारित हायड्रोलिक यंत्रणेमुळे एकंदर उत्पादनक्षमतेमध्ये १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. बनाना बूम, जॉयस्टीक लिव्हर, कणखर आरेखन आणि विशाल बकेटस या सारख्या अतिशय अनोख्या आणि एकमेवाद्वितीय वैशिष्ट्यांमुळे अर्थमास्टर श्रेणी ही सर्व प्रकारच्या खाणकाम, ट्रेन्चिंग, क्रशर्स, इमारत बांधकाम किंवा बांधकाम उद्योगातील अन्य कोणत्याही कामासाठी अत्यंत उपयुक्त आणि सयुक्तिक अशी ठरणार आहे. एसएक्स आणि व्हीएक्स (SX & VX) या दोन प्रकारात ती उपलब्ध करून देण्यात आली असून त्याला फेरविक्री मूल्याची शाश्वती जोडण्यात आल्याने केवळ उपकरण खरेदी करतानाच नव्हे तर त्याची पुन्हा विक्री करायची वेळ आल्यानंतर देखील मनाची शांती आणि स्वस्थता लाभणार आहे.
एसएक्स स्मार्ट५० उत्पादन हे नवीन कमी एचपी श्रेणीतील असून ते भाडेतत्वारील कामकाजासाठी अधिक संयुक्तिक ठरेलसे आहे. महिंद्रा ५० एचपी डायटेक बीएस थ्री इंजिनसह या उत्पादनाची निर्मिती करण्यात आली असून ७४एचपी ताकदीच्या यंत्राइतकीच क्षमता यातूनही मिळावी यादृष्टीने त्याला समन्वित हायड्रोलिक्स बसविण्यात आलेले आहेत. एसएक्स स्मार्ट५० हे किमतीच्या बाबतीत दक्ष असणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून अतिशय स्पर्धात्मक कमीत कमी मर्जीन श्रेणीत तयार करण्यात आले आहे.
नवीन अर्थ मास्टर मालिकेमध्ये चालकाचा आराम आणि सोय लक्षात घेऊन पुढील बाजूने एर्गोनॉमिक आरेखन करण्यात आलेले आहे. टींटेड ग्लास, कोट हँगर, मोबाईल आणि पाण्याची बाटली ठेवण्यासाठी खास होल्डर या काही वैशिष्ट्यपूर्ण सुविधांच्या जोडीनेच सुधारित बनलेले चालकाचे केबिन त्याला आरामदायीपणा आणि सुरक्षितता देखील पुरेपूर देते. आमच्या ग्राहकांना अधिकाधिक नफा आणि मालमत्ता फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेली अर्थमास्टर मालिका ही आपल्या विशिष्ट कामकाज श्रेणीमध्ये उद्योगक्षेत्रातील सर्वात कमी देखभाल खर्च असणारी ठरणार आहे.
महिंद्रा रोडमास्टर BSIV ची माहिती
नवीन BSIV रोडमास्टर मालिका अतिशय परिपूर्ण सोल्युशन्स पुरविणारी आहे. स्मार्ट सिटी, भारतमाला इत्यादी महत्वाच्या शासकीय योजनांकरीता रस्ते कंत्राटदारांना आवश्यक असणाऱ्या गरजांची तसेच प्रमुख जिल्हानिहाय रस्ते, राज्य महामार्ग, सीमावर्ती भागातील रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारकार्य या सर्वच बाबतीतील गरजांची पूर्तता करणारी अशी ही मालिका आहे.
जी९०७५ (G9075) ला ७४बीएचपीचे शक्तिशाली सीआरआय इंजिन बसविण्यात आले असून त्याच टॉर्क ३५०एनएम पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे राज्य महामार्ग, ग्रामीण रस्ते, जिल्हानिहाय रस्ते आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अन्य प्रकल्प यांच्यासाठी ते आदर्श ठरेल असेल बनले आहे. या मोटरग्रेडरला ३ मीटर (१० फुटी) विस्तारित ब्लेड्स बसविण्यात आली असून ग्राइंडिंगच्या दर्जात कुठेही तडजोड होऊ न देताही पारंपरिक मोटर ग्रेडर्सच्या तुलनेत हे ४० टक्के कमी खर्चात काम करते.
जी९५९५ (9595) ला ९५ बीएचपीचे शक्तिशाली सीआरआय इंजिन बसविण्यात आले असून त्याच टॉर्क ४०० एनएम पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांची विस्तार प्रक्रिया, रेल कॉरिडोर आणि औद्योगिक प्लॉट लेव्हलिंग सारख्या प्रकल्पांसाठी ते आदर्श ठरेल असेल बनले आहे. चालकाची सोय आणि सुलभता हे मुद्दे लक्षात ठेवून जी९५९५ (9595) मध्ये एर्गोनॉमिक आरेखन केलेले खास वातानुकूलित केबिन बसवण्यात आलेले आहे. यामुळे चालकाला तणावमुक्त राहण्यास मदत होते आणि परिणामी त्याच्या एकदंर उत्पादकतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी सहाय्य मिळते.
रोड मास्टर मालिका ही मध्यम रस्ते, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्या बांधणीसाठी मोठ्या कंत्राटदारांच्या उत्पादन श्रेणीला परिपूर्ण बनवेल. रेल्वे ट्रॅक्स टाकण्यासाठी आणि औद्योगिक बांधकाम तसेच बंदरे येथील भूखंडांचे सपाटीकरण करण्यासाठी आवश्यक एमबँकमेंट किंवा अर्थवर्क सारख्या अॅप्लिकेशन्ससाठी देखील ती उपयुक्त ठरेलशी आहे.
आयमॅक्स (iMAXX) ची माहिती
बांधकाम उपकरण क्षेत्रातील आपल्या ग्राहकांना टेलेमॅटीक्स सोल्युशन्स पुरविण्यात महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रणेती राहिलेली आहे. “तीच परंपरा पुढे कायम ठेवत आयमॅक्स (iMAXX) टेलेमॅटीक्स टेक्नोलॉजी ही नवीन प्रणाली सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या अर्थमास्टर आणि रोडमास्टरच्या संपूर्ण मालिकेमध्ये ही भविष्यवेधी, निदानसूचक आणि समयसूचक अशी फ्लीट व्यवस्थापन प्रणाली आहे. ही प्रणाली म्हणजे तुमच्या उपकरणाबाबत आणि व्यवसायाबाबत अतिशय महत्वाची आणि जरुरी अशी माहिती तुम्हाला पुरविणारा एक वैयक्तिक मदतनीसच असणार आहे. आमच्या ट्रक व्यवसायामध्ये आयमॅक्स ही एक आधीच चाचणी घेतलेली आणि उपयोगी सिद्ध झालेली प्रणाली असून तिने अनेकप्रकारे ग्राहकांना लाभ मिळवून दिलेले आहेत. यातील अत्यंत प्रभावी यंत्र नियमन सुविधेमुळे ही प्रणाली खबरदारीची देखभाल राखण्याचे संकेत देते आणि त्यायोगे खूप मोठा ब्रेकडाऊन होणे टाळण्यासाठी सहायभूत ठरते.”
ही उत्पादने एक वर्षांच्या अमर्यादित तासांच्या वॉरंटीसह येत असून त्यामुळे ग्राहकांना पडणाऱ्या खर्चिक दुरुस्तीच्या आशंकेतून त्यांची सुटका होणार आहे. महिंद्राच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेमुळेच हे साध्य होऊ शकले असून त्याला अथक आणि काटेकोर चाचणी पद्धतीचे तसेच सर्वोत्तम सुटे भागच वापरण्याच्या नियमांचे आणि यंत्राचे आरेखन सुटसुटीत असण्याचे पाठबळ लाभेलेले आहे.
महिंद्राची सर्व बांधकाम उपकरणे (महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट) अतिशय खडतर अशा ठिकाणी आणि अत्यंत आव्हानात्मक अशा परिस्थितीत अतिशय काटेकोर आणि कठोर चाचण्या पार पडलेली असतात. कामगिरी, सुरक्षितता आणि विश्वासार्हता या निकषांवर त्यांना वैध करण्यात येत असते आणि त्यांना देशातील सर्व ठिकाणी अतुलनीय जोडणी असलेल्या महिंद्राच्या ५० हून अधिक डीलर विक्री व सेवा नेटवर्कचे पाठबळ लाभलेले आहे. अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने ती सुसज्ज असून परिपूर्ण, अतुलनीय गुणवत्ता, सर्वोत्कृष्ट स्टाईल, ऑपरेटरची सुलभता आणि आपल्या नाविन्यपूर्ण टेलेमॅटीक्स टेक्नोलॉजी आयमॅक्स (iMAXX) ने ती सुसज्ज आणि परिपूर्ण बनलेली आहे.
महिंद्राची बांधकाम उपकरणे (द महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट) ही महिंद्राच्या चाकण, पुणे येथील अद्ययावत प्रकल्पात उत्पादीत केली जातात. महिंद्राची उत्पादन विकसक टीम ग्राहकांकडून मिळणारा उदंड प्रतिसाद, सूचना यांच्या अनुषंगाने ही उत्पादने विकसित करण्याचे काम करते, आणि म्हणूनच ही उत्पादने भारताती अतिशय खडतर अशा भौगोलिक क्षेत्रात देखील मजबूत आणि अथक कामगिरी पार पाडतात. त्या जोडीला, त्या उत्पादनांमध्ये अद्ययावत वाहन प्रणाली व तंत्रज्ञानाचा समावेश केलेला असतो आणि ती स्पर्धात्मक किमतीला उपलब्ध करून दिली जातात.