मुंबई : २०.७ अब्ज डॉलर्स किंमतीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. ने आज मुंबईत काही निवडक मार्गांवर ग्लाइड ही उच्चतंत्रज्ञानावर आधारित ई- मोबिलिटी सेवा लाँच केली. या लाँचप्रसंगी डॉ. पवन गोएंगा, व्यवस्थापकीय संचालक, एम अँड एम, यांनी कंपनीच्या इलेक्ट्रिक सेदानच्या पहिल्यातुकडीतील १० ई- व्हेरिटोजना निशाण दाखवले.
ग्लाइडद्वारे ऑफिसला जाणाऱ्या अधिकाऱ्यांना कारशी जोडलेल्या विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांचा लाभ घेता येईल. त्यामध्ये वेब- कॉन्फरन्सिंग, निवडक भागिदारांकडूनखास तयार केलेले मनोरंजन आणि संगीत यांचा समावेश आहे. यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली विविध प्रकारची वैशिष्ट्ये उद्योगक्षेत्रात पहिल्यांदाच पाहायला मिळतअसून त्यात प्रायव्हसी स्क्रीन, आल्हाददायक प्रवासासाठी हवा शुद्धीकरण यंत्र आणि ताण न आणणारी प्रकाशयोजना यांचा समावेश असून त्यामुळे प्रवाशांना अशाप्रकारचापहिलाच अनुभव मिळेल. ताणमुक्त प्रवासासाठई सर्व गाड्यांना आरामदायी वैशिष्ट्ये उदा. बोल्स्टर्ड सीट्स, रॅप अराउंड हेडरेस्ट आणि खास तयार करण्यात आलेलेआर्मरेस्ट यांचा समावेश आहे.
या नाविन्यपूर्ण उत्पादनाबाबत डॉ. पवन गोएंका, व्यवस्थापकीय संचालक, एम अँड एम म्हणाले, ‘देशातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी या नात्याने महिंद्रानेवेळोवेळी नाविन्यपूर्ण ई- मोबिलिटी सेवा पुरवल्या आहेत. ग्लाइड हे असेच प्रमुख, दर्जेदार, ई- मोबिलिटी उत्पादन आहे जे दैनंदिन प्रवाशांचे प्रवासाचे समीकरण नव्यानेप्रस्थापित करेल. दैनंदिन प्रवासाच्या दिशेने आम्ही टाकलेले हे अभिनव पाऊल आहे, जे स्मार्ट, शाश्वत आणि प्रयोगशील प्रवासात सकारात्मक बदल घडवून आणेल.लवकरच आम्ही वेगवेगळ्या शहरांत विविध ई- मोबिलिटी उत्पादने लाँच करण्याच्या विचारांत आहोत.’
ग्लाइडने ही सेवा मुंबईत लाँच करण्यासाठी व्होडाफोन आयडिया लिमिटेड, सिस्को सिस्टीम्स लिमिटेड आणि इतर सेवा व कंटेंट पुरवठादारांशी भागिदारी केली आहे.