मुंबई : महिंद्रा ग्रुपने एका नवीन डिजिटल अभियानाचा शुभारंभ करत पर्यावरण रक्षणाच्या आपल्या दीर्घकालीन संकल्पाचे पालन केले आहे. वृक्षारोपणाचा संदेश देणाऱ्या या नवीन डिजिटल कॅम्पेनमध्ये#RiseAgainstClimateChange अर्थात वातावरणातील बदलांना रोखण्यासाठी एकजूट होण्यासाठी लोकांना प्रेरित केले जात आहे. या फिल्ममधे दाखवण्यात आले आहे की, या पृथ्वीवर सर्वात जास्त मेहनती आहेत ती झाडे, निस्वार्थ भावनेने जगभरातील झाडे वातावरणातील बदलांच्या विरोधात लढत आहेत. “माध्यम हाच संदेश आहे” या विचाराला नवी उंची मिळवून देत ही संपूर्ण फिल्म पुनःप्रक्रिया करण्यात आलेल्या रद्दी कागदांपासून बनवण्यात आली आहे. अशाप्रकारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी फिल्म स्वतःदेखील तसेच करते व कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करून त्याचा पुन्हा वापर करण्याचे महत्त्वदेखील समजावून सांगते.
महिंद्रा राईजच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर या अभियानाची सुरुवात होत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अभियान पोहोचावे यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे कार्यक्रम, स्पर्धा, पर्यावरण सुरक्षेमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या एन्व्हायरन्मेंट चॅम्पिअन्सचा सन्मान, काही निवडक स्वयंसेवी संस्थांसोबत आपापल्या भागांमध्ये सक्रिय होण्यासाठी लोकांना संधी मिळवून देणे असे कार्यक्रम आयोजित केले जातील. अशाप्रकारे वाढत जाऊन हे अभियान पर्यावरण संवर्धनाचे एक आंदोलन बनेल.
महिंद्रा ग्रुपचे ग्रुप कॉर्पोरेट ब्रँडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर विवेक नायर यांनी सांगितले, “महिंद्रा हा सामाजिक जबाबदारीचे पुरेपूर भान असलेला विश्वसनीय ब्रँड आहे. आमच्या “राईज” धोरणातून आम्ही समाजाचे कल्याण करण्याबरोबरीनेच लोकांनाही चांगल्या गोष्टींसाठी एकजूट होण्यासाठी प्रेरित करतो जेणेकरून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडून येऊ शकेल. आज संपूर्ण जगभरात या समस्येवर खूप बोलले जात आहे, आमची ही फिल्मदेखील पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे.”
नायर यांनी पुढे सांगितले, “#RiseAgainstClimateChange या अभियानात आम्ही पर्यावरणाची दुर्दशा हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आमची अशी इच्छा आहे की, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून या मुद्द्यावर लोकांना एकजूट केले जावे. आमचा हा संदेश अधिक जास्त प्रभावी व्हावा यासाठी आमच्या या फिल्मचे सेट्स पुनःप्रक्रिया केलेल्या रद्दी कागदांपासून बनवले गेले आहेत जेणेकरून आमच्या या संदेशातून प्रत्येक बाबतीत पर्यावरणाचे संरक्षण केले जावे.”
महिंद्रा टीमने भारतातील सामाजिक समस्यांविषयी सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांचा सखोल अभ्यास केला. आणि समस्येचे गांभीर्य बघता जशी अपेक्षा होती त्याप्रमाणेच देशातील मिलेनियल्सनी वातावरणातील बदल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे. ऑनलाईन चर्चांमध्ये २२ टक्क्यांपेक्षा जास्त चर्चा या मुद्द्यावर केल्या जातात.
संशोधनातील निष्कर्षांवरून या अभियानाचे महत्त्व अधिकच वाढले:
Ø जंगलांच्या छाटणीचे प्रमाण खूप जास्त आहे.
- गेल्या काही दशकांमध्ये जगातील ८० टक्के जंगले नष्ट झाली आहेत किंवा पूर्णपणे खराब झाली आहेत.
- आपण दरवर्षी १८.७ मिलियन एकर म्हणजेच तब्बल २७ फुटबॉल मैदाने होतील इतके विशाल जंगल कायमचे गमावत आहोत.
या फिल्ममधे ऍनिमेशनचा उपयोग केला गेला आहे. यातील संपूर्ण सेट व प्रत्येक गोष्ट पुनःप्रक्रिया करण्यात आलेल्या कागदापासून बनवली गेली आहे. हायवे, पूल, कारखाने, झाडे, इतकेच नव्हे तर, धुरदेखील कागदापासून बनवला आहे. चित्रे व त्यापाठोपाठ येणारे व्हॉईसओव्हर याद्वारे माणसाने पर्यावरणावर केलेल्या नकारात्मक परिणामांना दाखवले गेले आहे व दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतात ती शांत व विनम्र झाडे जी निरंतर कठोर प्रयत्न करत पर्यावरणाला स्वच्छ राखत असतात. फिल्मचे काम पूर्ण झाल्यावर पुनःप्रक्रिया केलेल्या कागदापासून तयार करण्यात आलेले सर्व सेट्स तोडून या अभियानाच्या संदेशाचे पुरेपूर पालन करत त्यापासून खतनिर्मिती करण्यात आली.
अभियानाचा उद्देश व मूळ संकल्पना याबाबत माहिती देताना महिंद्रा अँड महिंद्राचे उपाध्यक्ष समूह सीएसआर सुशील सिंह यांनी सांगितले, “महिंद्रा समूह गेल्या कित्येक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून वातावरणातील बदलांवर उपाययोजना करत आहे. आमच्या हरियाली उपक्रमातून १५ मिलियनपेक्षा जास्त झाडे लावली गेली आहेत. आपण सर्व एकजूट होऊन सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो व आम्हाला खात्री आहे की, ही फिल्म माहिती देण्याबरोबरीनेच लोकांना सक्रिय होण्यासाठीदेखील प्रेरणा देईल.”
महिंद्राच्या हरियाली उपक्रमातून २००७ सालापासून देशाच्या विविध भागांमध्ये १५ मिलियनपेक्षा जास्त झाडे लावली गेली आहेत. या कार्यक्रमामुळे देशात हरित क्षेत्राचे प्रमाण वाढले इतकेच नव्हे तर, रोजगार संधी वाढल्या, अनेक स्थानिकांना शाश्वत पोषण संरक्षण मिळाले.
फिल्म पाहण्यासाठी लिंक: http://bit.ly/HardestWorkersFilm