१९ अब्ज यूएस डॉलर्सच्या महिंद्रा ग्रूपचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने जितो मिनिव्हॅनचे उद्घाटन केल्याचे आज जाहीर केले, स्टायलिश आणि आरामदायी प्रवासी गाडी यशस्वीपणे जितोच्या व्यासपीठावर विकसित करण्यात आली आहे. जितो मिनिव्हॅन शहरी आणि निमशहरी वाहतूक प्रकारांसाठी उत्तम आहे आणि प्रत्येक व्यक्तीलाही ती कनेक्टिव्हिटी सेवा पुरवेल, उत्तम करार आणि प्रत्येक टप्प्यावरील प्रवासी गाडी टूर/प्रवासासाठी आणि शहरांतर्गत लोकांच्या वाहतुकीसाठी उत्तम पर्याय आहे. जितो मिनिव्हॅनची किंमत ३.४५ lac रुपये (बीएसआयव्ही डिझेल प्रकारासाठी एक्स-शोरूम मुंबई) आहे आणि दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, खास करून हार्ड टॉप आणि सेमी हार्ड टॉप प्रकारांत उपलब्ध आहेत आणि डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी अशा तीन प्रकारच्या इंधनांमध्ये उपलब्ध आहे.
जितोच्या व्यासपीठावरून परिणामकारकरीत्या सेवा देता यावी, आणि ग्राहकांच्या विविध प्रकारातील गरजांची पूर्तता व्हावी, तसेच कार्गो वाहतुकीच्या प्रकारांचीही पूर्तता व्हावी अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. तीन चाकीच्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक जितो मिनिव्हॅन सादर करून, कंपनीने आकर्षक एक्सेंज आणि वित्तीय योजनाही सादर केल्या आहेत, या योजना कमी डाऊन पेमेंट पर्यायांच्या असून, परवडणाऱ्या इएमआयद्वारे दीर्घकाळ चालणाऱ्या आहेत. सनराइज रेड, अल्ट्रामरीन ब्लू आणि डायमंड व्हाइट या तीन रंगांत ते उपलब्ध आहेत. ही गाडी टप्प्यांमध्ये सादर केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जितो मिनिव्हॅनचा सेमी हार्ड टॉप डिझेल प्रकार सादर केला जाईल, तर पुढील दोन महिन्यांमध्ये जितो मिनिव्हॅनची हार्ड टॉप सीएनजी आणि डिझेल श्रेणी तसेच सीएनजी आणि पेट्रोल प्रकारची श्रेणी सादर केली जाईल.