महिंद्रा अँड महिंद्रा लि. या 19.4 अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचा (एफईएस) भाग असलेल्या कंपनीने विविध यांत्रिकीकरण तंत्रे आणि उत्पादनांच्या मदतीने शेतकऱ्यांना सक्षम करत आहे. डिजिटल आणि डेटावर आधारित शेती हे निश्चितपणे शेतीचे भविष्य असून महिंद्राने या वर्षाच्या सुरुवातीला भारतातील विविध राज्यांत क्रिश- ई लाँच केले होते. ‘एक्सपर्ट तकनीक. नये उपाय. परिणाम दिखाये’ अशी टॅगलाइन असलेला ‘क्रिश-ई’ हा नवा व्यवसाय विभाग असून त्याद्वारे तंत्रज्ञानावर आधारित, प्रगतीशील, सहजपणे उपलब्ध असणारे आणि शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान पुरवले जाते. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेवांच्या मदतीने पिकाच्या संपूर्ण चक्रादरम्यान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट त्यामागे ठेवण्यात आले आहे.
हे कृषीशास्त्र सल्लागारांच्या मदतीने धोरणात्मक पद्धतीने, अत्याधुनिक शेती उपकरणे भाडेशुल्कावर उपलब्ध करून देत, नव्या युगातील शेतीविषयक उपाययोजनांच्या मदतीने घडवले जात असून त्यामागे शेती करण्याचा खर्च कमी करणे, पिकाची उत्पादनक्षमता वाढवणे व पर्यायाने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. भारतात शेतीचे नवे, डिजिटल युग अवतरावे या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण व्यवसाय विभाग जन्मास आला आहे. या विभागाने शेतकऱ्यांचे आयुष्य आमूलाग्र बदलण्याचे, त्यांना एआय, आयओटीवर आधारित डिजिटल व परवडणाऱ्या उपाययोजना, अधिक प्रभावी शेती तंत्रांचा अवलंब करण्यासाठी मदत करणे आणि त्यातून उत्पादनक्षमता तसेच नफा वाढवण्याचा मार्ग खुला करून देणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. महिंद्रा अँड महिंद्राने जगभरातील विविध कंपन्यांमधे धोरणात्मक गुंतवणूक केली असून त्यात रेसॉन ही कॅनेडियन भविष्यवेधी विश्लेषक कंपनी. गामाया – स्विस हायपरस्पेक्ट्रल इमेज विश्लेषक कंपनी आणि कारनॉट – भारतीय एआय अनेबल्ड शेती आयओटी कंपनी यांचा समावेश आहे.
‘सक्षम शेतकऱ्यांचे’ राष्ट्र घडवण्यासाठी क्रिश-इ च्या अचूक शेतीविषयक सेवा शेती, ड्रोन्स, उपग्रह आणि शेती उपकरणांवरील सेन्सर्स व कॅमेऱ्यांचा वापर करून माती, पिके आणि यंत्रांशी संबंधित माहिती गोळा करतात. एआय अल्गोरिदम्स या माहितीचे सामान्यांना समजेल असे मुद्दे, शेतीचे सविस्तर नकाशे यांच्यात रुपांतर करून शेतकरी आणि कृषीशास्त्रज्ञांना बुद्धीमान यंत्रे वापरून वेगवेगळ्या पद्धतीने शेती करणे शक्य करते. या तंत्राचा बटाटा, द्राक्षे आणि ऊस शेतकऱ्यांना लागवडीची किंमत कमी करण्यासाठी व त्यांचे उत्पादन उंचावण्यासाठी मदत होत आहे.
कंपनी शेती यंत्रांची श्रेणी तयार करण्यासाठी सध्या काम करत असून त्याला जगभरातील मोठमोठ्या शेतांवर वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, ही श्रेणी लहान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परवडणारी आणि सहज उपलब्ध केली जाईल.
या दिशेने पाऊल टाकत कंपनीने गेल्या काही वर्षांत शेती तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप्स क्षेत्रात सहकार्य व संपादन केले आहे. ही संपादने आणि भागिदारींच्या आधारावर महिंद्राने बटाटा व भात शेतीसाठी प्लँटर्स तयार केले आहेत.
या महामारीच्या काळात झालेल्या कामगारांच्या स्थलांतरामुळे शेतकामात यंत्रांच्या वापराला चालना मिळाली आहे. पर्यायाने आर्थिक वर्ष 2021 मधे शेती यंत्रांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. महिंद्राकडे शेती यंत्रांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असून कंपनी सध्या ‘ग्लोबल सेंटर्स ऑफ एक्सलन्स’मधून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे नवी यंत्रे लाँच करण्यासाठी काम करत आहे.
महिंद्राचे ग्लोबल सेंटर्स ऑफ एक्सलन्ट पुढीलप्रमाणे –
- जपान – भाती शेती यंत्रणा मूल्य साखळी आणि हलक्या वजनाचे ट्रॅक्टर्स
- फिनलँड – हार्वेस्टर्स आणि फॉरेस्ट मशिनरी
- तुर्की – शेती अमलबजावणी