मुंबई, 16 जानेवारी 2025: महिंद्राच्या इलेक्ट्रिक ओरिजिन eSUVs असलेल्या BE 6 आणि XEV 9e यांनी भारत-नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम (भारत-एनसीएपी) वर सर्वोच्च 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह सर्वाधिक स्कोअर मिळवत इतिहास रचला आहे. या महत्वपूर्ण टप्याने महिंद्राच्या इलेक्ट्रिक युगातील सुरक्षित SUV तयार करण्याच्या नव्या मापदंडाची सुरूवात केली आहे.
XEV 9e ने प्रौढ प्रवाशांच्या संरक्षणासाठीच्या मूल्यांकन चाचणीत 32/32 असा परिपूर्ण स्कोअर मिळवला. त्यानंतर बाल प्रवाशांच्या संरक्षणासाठीच्या चाचणीत 45/49 असा स्कोअर मिळवला. BE 6 ने प्रौढ प्रवाशांच्या संरक्षणासाठी जवळजवळ परिपूर्ण 31.97/32 स्कोअर मिळवला आणि बाल प्रवाशांच्या संरक्षणासाठी XEV 9e प्रमाणेच 45/49 स्कोअर मिळवला.
यातून महिंद्राच्या सर्वाधिक महत्वाच्या सुरक्षा प्रतिबद्धतेची हमी अधोरेखित करत भारत-एनसीएपीच्या मूल्यांकनानुसार ही वाहने भारताच्या रस्त्यावरील केवळ सर्वात सुरक्षित EVs नाहीत तर सर्वात सुरक्षित SUVs देखील बनली आहेत.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आर वेलुसामी म्हणाले, “BE 6 आणि XEV 9e ने केवळ महिंद्राच्याच नव्हे तर भारतातील ऑटोमोटिव्ह सुरक्षेच्या नवीन युगाची सुरुवात केली आहे. INGLO आर्किटेक्चरवर तयार आणि MAIA या ऑटोमोटिव्ह जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित BE 6 आणि XEV 9e हे ऑटोमोटिव्ह अनुभवाच्या प्रत्येक अंगामध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करण्यासाठी डिझाइन केले आहेत. भारत-एनसीएपी चाचण्यांचे निकाल आमच्या सुरक्षेबाबत असलेल्या बांधिलकीचे प्रतीक असून महिंद्रा नेहमीच ऑटोमोटिव्ह सुरक्षेच्या आघाडीवर आहे याची याद्वारे पुष्टी होते.”
सर्वात अलीकडील भारत-एनसीएपी निकालांमुळे BE 6 आणि XEV 9e यांनी महिंद्राच्या 5-स्टार रेट केलेल्या वाहनांच्या यादीत स्थान मिळवले आहे. थार ROXX, XUV 3XO आणि XUV400 यांनी अलीकडेच भारत-एनसीएपी मोजपट्टीवर सर्वाधिक रेटिंग मिळवले, तर XUV700 आणि स्कॉर्पिओ-N यांनी ग्लोबल एनसीएपी स्केलवर समान 5-स्टार रेटिंग मिळवले आहे.
प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्ये
BE 6 आणि XEV 9e या वाहनांमध्ये सक्रिय आणि पॅसीव्ह सुरक्षा वैशिष्ट्यांचा संपूर्ण संच आहे. हे सर्व नाविन्यपूर्ण उद्देशाने तयार केलेल्या INGLO इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले असून त्यातून सुरक्षेला अधिकच पुढे नेण्यात आले आहे.
बॅटरी कमी गुरुत्वाकर्षण केंद्रावर ठेवल्यामुळे विशेषतः SUV च्या जास्त गुरुत्वाकर्षण केंद्राचा प्रश्न सोडवत INGLO स्थिरता आणि हाताळणी यात सुधारणा करते. प्रगत संरचनात्मक डिझाइन बॅटरी पॅकला अंडरबॉडीमध्ये सामावून घेते आणि प्रवासी केबिनभोवती एक संरक्षक संरचना तयार करते. अल्ट्रा-हाय-स्ट्रेंथ बोरॉन स्टील आणि मजबूत अशी पुढच्या बाजूची संरचना अतुलनीय सुरक्षा पुरविते. INGLO प्लॅटफॉर्म अतिशय उष्णता आणि कठीण अपघात चाचण्या सहन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, बॅटरी सुरक्षितता प्राधान्याने देण्यात आली आहे. EV साठी ही अत्यंत महत्वाची आहे. BE 6 आणि XEV 9e ला शक्ती देणारी बॅटरी कठोर चाचण्यांच्या अधीन केली गेली असून त्यामुळे त्यांची मजबुती आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.
INGLO प्लॅटफॉर्मसह महिंद्राचे स्वतःचे MAIA तंत्रज्ञान आर्किटेक्चर BE 6 आणि XEV 9e वरील सक्रिय सुरक्षा प्रणालींना चालना देते. या दोन eSUVs प्रगत लेव्हल 2+ ADAS सूटसह सुसज्ज असून त्यात पाच रडार्स आणि एक व्हिजन कॅमेरा यांचा समावेश आहे. यामध्ये ड्रायव्हर-इनीशीएटेड ऑटो लेन बदल, लेन सेंटरिंग आणि आपत्कालीन स्टीयरिंग सहाय्य, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, क्रॉस ट्रॅफिक अलर्ट्स, फ्रंट कोलिजन वॉर्निंग आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग यासारखी वैशिष्ट्ये आहेत.
BE 6 आणि XEV 9e मध्ये 360-डिग्री कॅमेरा, व्हिजनX ऑगमेंटेड रिअॅलिटी हेड्स-अप डिस्प्ले (HUD) TPMS, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, सिक्युअर 360 लाईव्ह व्ह्यू आणि रेकॉर्डिंग फंक्शनॅलिटी, इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक ब्रेक बूस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, समोरील फॉग लॅम्प्स, कॉर्नरिंग लॅम्प्स, ऑटो बूस्टर लॅम्प्स आणि सात एअरबॅग्ज देखील आहेत.