मुंबई, १२ ऑक्टोबर २०२१: क्रिश-इ या महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्मिंग अॅज अ सर्व्हिस (FaaS) व्यवसायाने ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केलेल्या भारतीय चित्रपट अभिनेते मनोज बाजपेयी अभिनित नवीन क्रिश-इ डिव्हीसी द्वारे आज दोन नवीन शेतकरी पूरक अॅप्स क्रिश-इ आणि क्रिश-इ निदान अॅप सादर करत असल्याचे जाहीर केले.
क्रिश-इ हा महिंद्राचा २०२० मध्ये सादर करण्यात आलेला नवीन व्यवसाय असून त्याद्वारे शेतकऱ्यांना परवडतील, सहज साध्य होतील अशा प्रगतीशील, तंत्रज्ञान प्रणीत सेवा पुरविल्या जातात. ओमनी चॅनेलच्या द्वारे संपूर्ण पीक चक्रात प्रत्यक्ष आणि डिजिटल सेवांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न वाढविणे हे क्रिश-इ चे ध्येय आहे. नवीन डिव्हीसी मधून क्रिश-इ अॅपचे वैशिष्ट्यपूर्ण फायदे शेतकऱ्यांना सांगत राहण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये सखोल शेतीची पार्श्वभूमी असलेले आणि देशातील सर्वाधिक प्रतिभाशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जाणारे मनोज बाजपेयी यांनी अभिनय केला आहे.
शेतीविषयक कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना तोंड द्यावी लागणारी आव्हाने आणि तज्ञांचा सल्ला तसेच ऑडीओ आणि व्हिडीओ आशयाचा वापर करून वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी आणि विभागांसाठी करावयाच्या सर्वोत्तम कृषी पद्धती समजावून सांगण्यासाठी क्रिश-इ अॅपची मदत कशा प्रकारे होते यावर या नवीन डिव्हीसी मध्ये भर आहे.
क्रिश-इ मोबाईल अॅप्सच्या सादरीकरणावेळी बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे कृषी उपकरण विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, “कृषी उत्पन्नात सुधारणा घडविणे या क्रिश-इ च्या ध्येयासह आज सादर केलेली आमची अॅप्स म्हणजे कृषी क्षेत्रात बदल घडविणे आणि आयुष्य समृद्ध करणे या महिंद्राच्या उदात्त उद्दिष्टाप्रती असलेली बांधिलकी सर्वार्थाने जपणे आहे. शेतकऱ्यांच्या हातात शेतीच्या अर्थकारणाची सूत्रे देऊन आणि माहिती प्रणीत शेती करून दर एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मदत करत आहोत. मूळची कौटुंबिक शेती असलेल्या आणि जनमानसात लोकप्रिय असणाऱ्या मनोज बाजपेयी यांच्यासारख्या कलाकाराशी सहयोग करताना आम्हांला प्रचंड आनंद होत आहे. आमच्या ब्रँडमूल्याशी सुसंगत असेच विश्वासार्ह, धैर्यवान आणि विनयशील व्यक्तिमत्वाचा समतोल मनोज यांच्यामध्ये आहे. मनोज यांच्या साथीने क्रिश-इ ब्रँड आणखी मजबूत होईल असा आम्हांला विश्वास वाटतो.”
क्रिश-इ अॅप मधून शास्त्रीय, मान्यताप्राप्त आणि व्यक्तिगत पीक सल्ला मिळतो. शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत आणि पद्धतीने तो सादर करण्यात आला आहे.
- ८ वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये ऊस, बटाटा, सोयाबीन, मिरची आणि भात शेतीसाठी तज्ञांचा सल्ला
- ‘पीक कॅलेंडर’, ‘खत कॅल्क्युलेटर’ आणि ‘स्प्रे कॅल्क्युलेटर’ यांसारख्या विविध कृतीशील मोड्यूल्स मधून संपूर्ण सल्ला
- सर्व प्रकारच्या व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी ‘डिजिटल खाते’ नावाची डिजिटल डायरी
- आपल्या आर्थिक हिशेबाची माहिती ठेवण्यासाठी ‘लेन-देन डायरी’
- क्रिश-इ सहायकांना जोडून घ्यायला मदत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांकरता या अॅपमध्ये ‘हेल्पलाईन’
- कोणत्याही तांत्रिक गरजांच्या पूर्ततेसाठी क्रिश-इ टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कृषी यंत्रसामुग्री भाड्यावर घेता येणार
दुसऱ्या बाजूला क्रिश-इ निदान अॅप हे तत्क्षणी शेतकऱ्यांना पिकावर पडलेल्या रोगाचे निदान करायला मदत करेल. सर्वसाधारणपणे २० सर्वाधिक लोकप्रिय पिकांवर पडणारी कीड आणि रोगाचे निदान याद्वारे होईल. या अॅपमुळे तत्काळ अचूक निदान होऊ शकेल आणि त्यावर उपायही सांगितले जातील. क्रिश-इ ची टॅगलाईन आहे ‘फोटो लो, रोग जानो.’ ही खूपच उच्च विशेष मोबाईल अॅप सुविधा असून यात प्रतिमा ओळखणे आणि मशीन लर्निंग या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम आहे. शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या पिकांचा स्पष्ट फोटो काढायचा आहे. अॅपवर बाधित झालेला भाग स्पष्ट दिसला पाहिजे. काही सेकंदात, ही सुविधा पिकावर पडलेला रोग वा कीड ओळखते आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि निवारण उपाय सुचविते.
गुगल प्ले स्टोअरवर दोन्ही अॅप्स मोफत उपलब्ध आहेत.
शेतीचे अर्थकारण, यांत्रिकीकरण आणि डिजिटलायझेशन यांना एकत्र आणून ओमनी चॅनेलच्या दृष्टीकोनाद्वारे क्रिश-इ आधीपासूनच शेतीमध्ये बदल घडवत आहे. ९० हून अधिक प्रत्यक्षातील क्रिश-इ दुकाने आणि जवळपास ३५०० डेमो प्लॉट्स यांसह क्रिश-इचे शेतकऱ्यांसोबत काम सुरु आहे. क्रिश-इच्या द्वारे महिंद्रा ‘चॅम्पियन फार्मर्स’ राष्ट्र घडवत आहे.















