रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑगस्ट २०२४ चा महिला लोकशाही दिन सोमवार 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.
जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टिने, जिल्ह्यातील महिलांना प्रायोगिक तत्वावर फोनद्वारे संपर्क करुन दि. 19 ऑगस्ट रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालयातील 1077 या टोलफ्री क्रमांकावर दुपारी 12 ते 1 या वेळेत त्यांचे निवेदन/ अर्ज नोंदविता येतील.