सायन : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पद्मश्री आण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी, संचालित ज्ञान विकास नाईट हायस्कुल सायन येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक परदेशी बी.एम. उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना परदेशी सर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या, व ते आपल्या भाषणात म्हणाले की, आजची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे, प्रत्येक क्षेत्रात पुरुषां प्रमाणे स्त्री हि काम करत आहे व आपला राष्ट्राचा तसेच देशाचा मान उंचावत आहेत त्याच प्रमाणे तुम्ही शिक्षण घेत असताना कोणालाही न घाबरता जीवनात यशस्वी झाले पाहिजे.ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले, डॉ प्रतिभा पाटील,कल्पना चावला,किरण बेदी,आदी महिलांनी खडतर कष्ट करून आपले जीवन यशस्वी केले त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. शाळेतील सह शिक्षिका जयश्री ठाकूर यांनीहि सर्व विद्यर्थिनींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षिका खिलौनि राउकर यांनी केले.