
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित ‘टायनी टॉट्स’ या पूर्व प्राथमिक विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त माता पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हाय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नजमा मुजावर उपस्थित होत्या. ‘टायनी टॉट्स’ विभागाच्या प्रमुख सौ. मनूश्री राणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर पाककला, निबंध स्पर्धा, पयफेक्ट मॅचिंग, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात माता पालक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पाककला स्पर्धेत सौ. प्रिया सावंत, स्नेहल मुंगल, उमा जाधव यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. निबंध स्पर्धेत सौ. परी सूर्यवंशी, सौ. सबिहा डिंगणकर आणि सौ. ऋजुता गुडेकर यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. परफेक्ट मॅचिंग स्पर्धेत सौ. शुभ्रा पालांडे, सौ. सायमा पटेल, सौ. परी सूर्यवंशी यांनी तर वक्तृत्व स्पर्धेत सौ. माधवी कांबळे, सौ. सोनू शर्मा आणि सौ. सबिहा डिंगणकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
यावेळी मार्गदर्शन करताना संचलिक सौ. हेगशेट्ये यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व विशद करून माता पालकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि दैनंदिन कामातून विरंगुळा मिळावा या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका सौ. मुजावर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त करून महिलांनी स्वावलंबी असणे गरजेचे असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीनियर केजीच्या शिक्षिका लुब्ना दवे यांनी केले.