मुंबई : डेन्व्हर या पुरुषांसाठीच्या प्रीमियन सुगंधाच्या ब्रॅंडने नुकतेच तेलुगू सुपरस्टार महेश बाबू याची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती करण्यामागे डेन्व्हरचा उद्देश दक्षिण भारतीय बाजारपेठेत सुगंधी ब्रॅण्ड्ससाठी असलेल्या प्रचंड मोठ्या संधीचा लाभ घेण्याचा आहे. या संबंधाच्या पहिल्या टप्प्यात महेश बाबूला दर्शविणारे एक टीव्हीसी सादर करण्याची त्यांनी योजना आहे जेणे करून त्या प्रदेशातील अधिकाधिक लोकांपर्यंत ब्रॅंड पोहोचू शकेल.
डेन्व्हरचे संचालक (मार्केटिंग अँड सेल्स) सौरभ गुप्ता म्हणाले,“दक्षिण भारत प्रांतातील तरुणांचा आयकॉन आणि आदर्श असलेला महेश बाबू या ब्रॅंड साठी अगदी योग्य निवड आहे. आम्हाला खात्री आहे की, या अनुबंधातून आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मने काबिज करू शकू, व त्यायोगे दक्षिण भारतीय बाजारपेठेत आमचा व्यवसाय उल्लेखनीय असा वाढवू शकू.”
महेश बाबू म्हणाला, “डेन्व्हर हा असा ब्रॅंड आहे,ज्यातआपल्या उत्कृष्ट उत्पादनांच्या जोरावर प्रचंड वृद्धीची क्षमता आहे. जे लोक आपल्या यशाचा आनंद घेतात आणि जीवनात दर्जेदार गोष्टींची कदर करतात अशा पुरुषांसाठी या फ्रॅग्रंसेसची रेंज अनुकूल आहे.
दक्षिण भारतात डेन्व्हरचा मार्केटमधील हिस्सा सध्या २% आहे, तर एकंदर भारतातील त्याचा हिस्सा ७% आहे. या भागीदारीमुळे दक्षिण भारतातील हिस्सा ३००% वाढेल अशी डेन्व्हरला अपेक्षा आहे. त्या भागात सर्वात लोकप्रिय फ्रॅग्रंस ब्रॅंड बनण्याचे त्यांचे लक्ष्य आहे व त्यायोगे येत्या दोन एक वर्षात पुरुषांसाठीचा सर्वसमावेशक ग्रूमिंग ब्रॅंड बनण्याच्या त्यांच्या व्हिजनला देखील पाठबळ मिळेल.