रत्नागिरी ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीमार्फत भाजपतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीत शक्तीप्रदर्शन केले. हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयात ना.राणे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे दाखल केला. परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्गतून आलेल्या हजारो गाड्यांमुळे भरदुपारी रत्नागिरी पूर्णतः ठप्प झाली होती. रत्नागिरी शहरासह कुवारबावपर्यंत दुतर्फा वाहतूक ठप्प झाल्यामुळे शहर थांबले होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज अखेरच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महायुतीकडून बरेच दिवस उमेदवाराचे नाव निश्चित केले जात नव्हते, परंतु काल दुपारी ना. राणे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली. किरण सामंत हे सुद्धा स्पर्धेत होते, परंतु राणे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आज ते ना.राणे यांच्यासोबतच होते.
आज ना.राणे यांच्यासमवेत गोव्याचे मुख्यमंत्री ना.प्रमोद सावंत, पालकमंत्री ना.उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, मंत्री ना.दीपक केसकर, मंत्री ना.रवींद्र चव्हाण, आमदार शेखर निकम, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक समन्वयक अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, आरपीआय (आठवले गट), रासप, रयत क्रांती या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मारुतीमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात झाली. ढोल-ताशांचा गजर, भगवे झेंडे व महायुतीतील सर्वांचे झेंडे फडकत होते. गाडीमध्ये मंत्री ना.नारायण राणे यांच्यासह मान्यवर नेतमंडळी सहभागी होते. ते अभिवादन करत होते. दुपारच्या कडक उन्हातही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बऱ्याच वाहनांतून कार्यकर्ते आल्यामुळे सर्व मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. शहरातही मारुती मंदिरपासून जयस्तंभापर्यंत हीच स्थिती होती.
जयस्तंभ येथे एका सजवलेल्या कंटेनरवर छोटेखानी सभा झाली. त्यावेळी राणे म्हणाले की, आम्ही सावलीत आहोत व सर्व कार्यकर्ते उन्हात आहात. तुम्ही दोन किलोमीटर चालत आलात. हे तुमचे प्रेम, पक्षनिष्ठा व मला असे कार्यकर्ते मिळाल्याबद्दल आभार मानतो. कार्यकर्त्यांना जास्त वेळ उन्हात ठेवणे योग्य वाटत नाही. आज देवेंद्र फडणवीस येणार होते, परंतु आज नागपुरला मतदान असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, आज हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मला मला पाठिंबा, शुभेच्छा दिल्याबद्दल मी आभारी आहे. भाजपाने उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे.