
मुंबई, (निसार अली) : राष्ट्र सेवा दल मालवणीच्या वतीने दिनांक 28 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता मालवणीत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त मानवंदना अर्पण करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीधर क्षीरसागर यांनी उपस्थितांना महात्मा फुले आणि आजची परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन केलं. त्यानंतर उपस्थितांनीही या चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. टीडीएफ चे उपाध्यक्ष लालजी कोरी, दिशा संस्थेच्या रुबिना खान, आकार सामाजिक संस्थेच्या आशा कांबळे, सोवरीन पीस लव्हींग सिटीझन्स समिती उपाध्यक्षा वैशाली सय्यद, किरण सोलंकी, सोनल मुखीया आदी उपस्थित होते.















