मुंबई : महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज विधानभवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पदुम मंत्री महादेव जानकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर,सहकार राज्यमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यासह विधीमंडळाच्या दोनही सभागृहाचे सदस्य यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानभवन येथील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.