मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आर.ए.राजीव, अपर सचिव एम.के.वाव्हळ, कक्षअधिकारी आर.एम.गोसावी, अजित पालवे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
विधानभवनातही अभिवादन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, विधान परिषद सभापतींचे सचिव महेंद्र काज,विधानसभा अध्यक्ष यांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रविंद्र जगदाळे, उपसचिव ऋतुराज कुडतरकर यांच्यासह विधानभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालया शेजारील उद्यानात सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्यानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महात्मा गांधी स्मारक समितीच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी स्मारक समितीचे देवराज सिंग, संतोष भोईर, एस.पी.आहुजा, राम जाधव, प्रो. अमरसिंग आदी यावेळी उपस्थित होते.