नवी दिल्ली : राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ४२ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर ३९ जणांना ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत.
राष्ट्रपती पोलीस पदकामध्ये मुंबईचे अतिरिक्त महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, रत्नागिरी जिल्ह्याच्या चिप
ळूण विभागाचे उपअधीक्षक महादेव श्रीपती गावडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाप्पा इरप्पा मोर्टी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील 39 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
महादेव भिमराव तांबडे(पोलीस अधीक्षक, सी.आय.डी.), शांतीलाल अर्जुन भामरे (पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा मुंबई), यशवंत नामदेव वटकर (सहायक पोलीस महानिरीक्षक, मुंबई), सुनिल वामनराव खालाडकर, (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर), संजय शामराव निकम (पोलीस उपअधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई), विजयसिंग रामकृष्ण गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर), फासिउद्दीन मोइनिउद्दीन खान (पोलीस निरीक्षक, एम.टी. विभाग, औरंगाबाद शहर), सावता महादेव शिंदे, (पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड), संजय गणपत सुर्वे (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर), सुखलाल आनंद वरपे (पोलीस निरीक्षक, मुंबई), श्रीमती सीमा दीपक मेहेंदळे (पोलीस निरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे शहर), संजय भाऊसाहेब नाईक-पाटील (पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे, पुणे शहर), अभय शामसुंदर कुरूंदकर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण), प्रकाश मनोहर नलावडे (सहायक पोलीस निरीक्षक, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई), श्रीकांत चंद्रकांत उबाळे (सहायक पोलीस उपनिरीक्षक, विशेष कार्यदल, बीड), बबनराव बाळासाहेब भोर (पोलीस उपनिरिक्षक, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर), विजय राजाराम अंबेकर (पोलीस उपनिरीक्षक, दरोडा विरोधी कक्ष, कुर्ला, मुंबई शहर), अजिनाथ दत्तात्रय वाकसे ( सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, महाराष्ट्र), पुनाजी पांडुरंग डोईजड (सहायक पोलीस उपनिरीक्षक, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, पुणे), अशोक बाबुराव गायकवाड (सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, लातूर), अशोक शिवराम झगडे (सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण), अरूण आत्माराम पोटे (सहायक पोलीस उपनिरीक्षक, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, पुणे), विद्याधर रंगनाथ टेकाळे (सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीआरओ, लातूर), जगन्नाथ देवीदास सुर्यवंशी ( सहायक पोलीस उपनिरीक्षक, डीएसबी, लातूर), कल्याण महादेव घोडके (सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, एमटी विभाग, बीड), संजय जगन्नाथ खरात (सहायक पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर शहर), हनुमंत सखाराम तुळसकर (सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफ जीआर व्ही ३, मुंबई), विलास कोंडीबा घोगरे (मुख्य शिपाई, शंकर नगर पोलीस ठाणे, पुणे शहर), राजेंद्र पांडुरंग कारंडे (मुख्य शिपाई, वर्सोवा पोलीस ठाणे, मुंबई शहर), अशोक आनंदराव हुंबे (मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर), बलवंत दत्तात्रय यादव, (मुख्य शिपाई, समर्थ पोलीस ठाणे, पुणे शहर), रमेश महादेव जाधव (मुख्य शिपाई, पोलीस नियंत्रण कक्ष, ठाणे शहर), मोहन पोशा मोरे (मुख्य शिपाई, सायबर सेल गुन्हे शाखा, रायगड), अशोक बजरंग कांबळे (मुख्य शिपाई, विशेष शाखा, पुणे शहर), पांडुरंग शंकर खेडेकर (मुख्य शिपाई, एमआयडीसी महाड पोलीस ठाणे, रायगड), जयप्रकाश जगन्नाथ माने (गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग मुंबई), चंद्रकांत परभाती शिंदे (मुख्य शिपाई, आर्म पोलीस ताडदेव, मुंबई), जयवंत चंद्रकांत शंकपाल (मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर), राजीव विष्णू जाधव (मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर).
केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केले जातात. यावर्षी याअंतर्गत 100 पोलिसांना ‘विरता पोलीस पदक’(पीएमजी), 80 पोलिसांना उत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि 597 पोलिसांना ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण 42 पदकांचा समावेश आहे.