रत्नागिरी : महाशिवरात्रीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शिवमंदिरांमध्ये हजारो भाविकांनी ‘हर हर महादेव’ असा गजर करत शिवदर्शन घेतलं. रत्नागिरी शहरानजीकच्या स्वयंभू काशीविश्वेश्वर, संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर आणि राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वरसह जिल्ह्यातील अनेक शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच अभिषेकासह बेलभंडारा वाहण्यासाठी गर्दी केली होती.
रत्नागिरी शहरातील काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठीही पहाटेपासून मंदिरात भाविकांनी रीघ लावून शिवदर्शन घेतले. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवस्थळ मानल्या जाणार्या मार्लेश्वर या ठिकाणीही भाविकांनी शिवदर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. राजापुरातील धूतपापेश्वर येथील मंदिरातही शिवलिंगावर बेलाचा अभिषेक करण्यासाठी भाविकांची वर्दळ होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अन्य मंदिरातही महाशिवरात्रिनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती..