
नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले की महर्षी वाल्मिकी यांनी ‘रामायण’ च्या लेखनातून आदर्शवादावर आधारित जीवनपद्धतीचा परिचय करून दिला. जे आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी रामायण सारख्या महाकाव्याची निर्मिती करणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांचे स्मरण प्रेरणादायी असल्याचे सांगितले. जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, अमरावती विभागीय केंद्र संचालक डॉ. जयवंत वर्ते, कृषी विज्ञान केंद्र संचालक डॉ. नितीन ठोके, विद्यार्थी बहि:शाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार, महाज्ञानदीप प्रकल्प संचालक श्री. गणेश लोखंडे यांचायासह विद्यापीठातील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















