नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 46 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 41 पोलीसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 946 पोलीस पदक जाहीर झाली असून तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस शोर्य पदक’ (पीपीएमजी), 177 पोलीसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), 89 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि 677 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 46 पदक मिळाली आहेत.
देशातील 89 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी –कर्मचा-यांचा यात समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.
१) श्री.रामचंद्र शिवाजी जाधव, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, पुणे पोलीस आयुक्तालय.
२) श्री.राजाराम रामराव पाटील,पोलीस उप अधिक्षक,एस.डी.पी.ओ करवीर विभाग,कोल्हापूर.
३) श्री.मिलींद भिकाजी खेटले,सहायक पोलीस आयुक्त,साकीनाका विभाग,पंचकुटीर पवारवाडी जे.वी.लिंक रोड,पवई,मुंबई.
४) श्री.हरिश्चंद्र गोपाळ काळे,सहायक पोलीस आयुक्त,राज्य राखीव पोलीस दल गट-2,पुणे.
५) श्री.मारुती कलप्पा सुर्यवंशी,सहायक पोलीस उपनिरीक्षक,जिल्हा विशेष शाखा,कोल्हापूर.
यासह महाराष्ट्रातील एकूण 41 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे
१) श्री.सुरेशकुमार सावलेराम मेंगडे, पोलीस अधिक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग ,ठाणे.
२) श्री.विक्रम नंदकुमार देशमाने ,पोलीय उपायुक्त ,विभाग -5 ,मुंबई.
३) श्री.नेताजी शेकुंबर भोपळे,सहायक आयुक्त ,गुन्हे शाखा ,नागपाडा मुंबई.
४) श्री.किरण विष्णु पाटील,सहायक पोलीस आयुक्त,आथींक गुन्हे कक्ष,मुंबई.
५) श्री.अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी,सहायक पोलीस आयुक्त,डोंगरी विभाग, मुंबई शहर.
६) श्रीमती.गोपिका शेषदास जहागिरदार,पोलीस उप अधिक्षक,महासंचालक कार्यालय,मुंबई.
७) श्री.मंदार वसंत धर्माधिकारी,पोलीस उप अधिक्षक,डहाणु विभाग,पालघर.
८) श्री.राजेंद्र लक्ष्मणराव कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे,पुणे शहर.
९) श्री.सय्यद शौकतअली साबीरअली,पोलीस निरीक्षक,पेठ-बीड पोलीस ठाणे,बीड.
१०) श्री.सतीश दिगंबर गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कळंबोली पोलीस ठाणे,नवी मुंबई.
११) श्री.बालाजी रघुनाथ सोनटक्के,पोलीस निरीक्षक,चिखली पोलीस ठाणे,चिंचवड- पुणे.
१२) श्री.रवीद्र गणपत बाबर,सहायक पोलीस निरीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे.
१३) श्री.अब्दुल रौफ गणी शेख,सहायक पोलीस निरीक्षक,साकिनाका पोलीस ठाणे,मुंबई शहर.
१४) श्री.रमेश दौलतराव खंडागळे,राखीव पोलीस उप निरीक्षक,पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर.
१५) श्री.प्रकाश भिवा कदम,पोलीस उपनिरीक्षक,पायधोनी पोलीस ठाणे,मुंबई शहर.
१६) श्री.किशोर अमृत यादव,पोलीस उपनिरीक्षक,चिंचवड वाहतूक विभाग,पिंपरी- चिंचवड, पुणे.
१७) श्री.दिलीप पोपटराव बोरसटे,पोलीस उपअधिक्षक,लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,पुणे.
१८) श्री.मुकुंद नामदेव हातोटे,सहायक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा,ठाणे.
१९) श्री.राजेंद्र नारायण पोळ,पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे शाखा,पुणे शहर.
२०) श्री.नानासाहेब विठ्ठल मसाळ,पोलीस उपनिरीक्षक,राज्य राखीव पोलीस दल गट -10,सोलापूर.
२१) श्री.रघुनाथ मंगलु भरसट,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,नाशिक ग्रामीण.
२२) श्री.केशव शेषराव टेकाडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,अमरावती शहर.
२३) श्री.रामराव दासु राठोड,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,जालना.
२४) श्री.दत्तात्रय तुकाराम उगलमुगले,सहायक पोलीस उपनिरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण.
२५)श्री.मनोहर लक्ष्मण चिंतलु,सहायक उपनिरीक्षक,विशेष शाखा,पुणे शहर.
२६) श्री.कचरु नामदेव चव्हाण,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पी.सी.आर ,अमरावती शहर.
२७)श्री.दत्तात्रय गोरखनाथ जगताप,सहायक पोलीस उपनिरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण.
२८)श्री.अशोक सोमाजी तिडके,सहायक पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे शाखा, नागपूर शहर.
२९) श्री.विश्वास शामराव ठाकरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,तहसील पोलीस ठाणे,नागपूर शहर.
३०) श्री.सुनील गणपतराव हरणखेडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,यवतमाळ.
३१) श्री.गोरख मानसिंग चव्हाण,सहायक पोलीस उपनिरीक्षक,विशेष शाखा,औरंगाबाद शहर.
३२) श्री.अविनाश सुधीर मराठे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,विशेष शाखा,पुणे शहर.
३३) श्री.खामराव रामराव वानखेडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,मांडवी पोलीस ठाणे,नांदेड.
३४)श्री.नितीन रामराव शिवलकर,सहायक पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक शाखा,नागपूर शहर.
३५) श्री.प्रभाकर धोंडू पवार,हेड कॉन्स्टेबल, राज्य गुप्तचर विभाग,मुंबई.
३६) श्री.अंकुश सोमा राठोड, हेड कॉन्स्टेबल, दहशतवाद विरोधी कक्ष, जालना.
३७) श्री.बालु मच्छिंद्र भोई, हेड कॉन्स्टेबल,वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण.
३८) श्री.श्रीरंग नारायण सावरडे ,हेड कॉन्स्टेबल,एल.टी मार्ग पोलीस ठाणे ,मुंबई शहर.
३९) श्री.अविनाश गोविंदराव सातपुते,हेड कॉन्स्टेबल,पोलीस मुख्यालय,नांदेड.
४०)श्री.मकसूद अहेमदखान पठाण,हेड कॉन्स्टेबल,पूर्णा पोलीस ठाणे,परभणी.
४१) श्री.गणेश तुकाराम गोरेगांवकर,हेड कॉन्स्टेबल,गुन्हे शाखा,मुंबई.