रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीनी हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रीया मागील काही महिन्यांपासून सुरु आहेत. मात्र अद्यापही ग्रामस्थांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे चौपदरीकरणसंदर्भात संभम होता, तो आता दूर झाला आहे. कारण त्या मोबदल्याचे ६०० कोटी प्रशासनाकडे आले आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पी. प्रदीप यांनी दिली आहे. या रकमेचे वाटप जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुरू झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली. ही रक्कम यापूर्वीच आली होती, मात्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमुळे रकमेचे वाटप थांबले होते, असेही प्रदीप यांनी स्पष्ट केले.