
मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) – भांडुप येथे मुंबई अग्रहरी वैश्य समाज संघ आयोजित महाराजा श्री अग्रसेन जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मेधावी विद्यार्थी गौरव कार्यक्रम व वैवाहिक परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.
भांडुप य़ेथे महाराजा श्री अग्रसेन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अग्रहरी वैश्य समाज संघाच्यावतिने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे वैवाहिक परिचय संमेलनाचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुण तरुणींनी घेतला. या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.














