मुंबई: भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ देऊन बृहन्मुंबई महापालिकेतर्फे गौरविण्यात येते. सन २०१६- २०१७ चा महापौरपुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर झाली असून यात ५० पैकी ३९ महिलांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी आज महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात जाहिर केली. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, हेमांगी वरळीकर, उपआयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत व शिक्षणाधिकारी महेश पालकर हे मान्यवर उपस्थित होते.
सन २०१६- २०१७ च्या महापौर पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा तसेच सीबीएसई आणि आयसीएसई शाळांमधून १२७ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० शिक्षकांची ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली.