१८८ ऑटोरिक्शा चालक व त्यांचे कुटुंबीय यांनी या मोफत तपासणीचा लाभ घेतला; तेरा व्यक्तींना मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला
१९ जानेवारी २०२३, मुंबई – महानगर गॅस लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या सिटी गॅस वितरण कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने ऑटो रिक्शा चालक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १२ जानेवारी २०२३ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर महानगर गॅस लिमिटेड यांच्या सीएसआर प्रकल्पाद्वारे – ‘एमजीएल आरोग्य’ द्वारे श्री शण्मुखानंद फाइन आर्टस व संगीत सभा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे आयोजन रीजनल ट्रान्स्पोर्ट ऑफिस , अंधेरी (पश्र्चिम) येथे करण्यात आले होते व त्यात १८८ लाभार्थ्यांनी मोफत नेत्र-तपासणीचा लाभ घेतला. त्यांपैकी, १३ रूग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय ३५ डायलेटेड इव्हॅल्यूएशन, ५ रेटिना इश्यूज आणि एका रुग्णाच्या बाबतीत काचबिंदू (ग्लॉकोमा) चे रोगनिदान करण्यात आले.
या शिबिराचे नियोजन महानगर गॅस लिमिटेड येथील सीएसआर टीमद्वारे करण्यात आले आणि श्रीमती पल्लवी कोटावदे, मुंबई (पश्र्चिम) च्या डेप्युटी आरटीओ, श्री. गुणवंत निकम, सीनियर इन्स्पेक्टर, आरटीओ मुंबई पश्र्चिम आणि श्री. थंपी कुरीयन,जनरल सेक्रेटरी, ऑटोरिक्शा युनियन हे या शिबिरासाठी उपस्थित होते.
एमजीएल आरोग्यचाच एक भाग म्हणून महानगर गॅस लिमिटेड यांनी श्री शण्मुखानंद फाइन आर्टस व संगीत सभा यांच्या सहयोगाने नेत्रशिबिरांचे आयोजन केले आहे ज्यात मुख्यत: ऑटो व टॅक्सी चालक आणि त्यांचे कुटुंबीय यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. अंधेरी पश्र्चिम येथे घेण्यात आलेले नेत्रतपासणी शिबिर हे या उपक्रमातील १० वे शिबिर असून याची सुरूवात फेब्रुवारी २०२२ मध्ये करण्यात आली आणि येत्या काही महिन्यात अशा प्रकारच्या आणखी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
आजपर्यंत, अशा शिबिरांमध्ये १३६५ व्यक्तींनी नेत्र-तपासणीचा लाभ घेतलेला आहे आणि ४०० मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आलेले होते, त्यापैकी २९० व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.