दापोली : तालुक्यातील महामाईनगर (कलमवाडी)ग्रामस्थांचे अनेक वर्षांपासूनचे कायमस्वरूपी
एसटी बस थांब्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. रविवार दि. 12 जानेवारील थांब्याचे लोकार्पण झाले. या बस स्टॉपसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मैथिली रघुनाथ गोवले तसेच देणगी स्वरूपात सहकार्य करणारे गावातील दानशूर व्यक्ती अजय रघुनाथ गोवले, जनार्दन लक्ष्मण गोवले, प्रभाकर, प्रमोद पांडुरंग सुर्वे, लक्ष्मण भिकू घाणेकर यांचा ग्रामस्थाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. बस स्टॉप जवळ वीज व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी लागणार खर्च नितीन गणपत साठे यांनी स्वखर्चाने केला आणि बस स्थानकाच्या नावाचा बोर्ड प्रकाश जनार्दन नामोळे (करजगाव) त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. तसेच बस स्टॉपचा आराखडा तयार करणारेआणि प्रामुख्याने लक्ष देऊन काम करून घेणारे जनार्दन गोवले आणि प्रभाकर सुर्वे यांचे विशेष आभार मानण्यात आले.
उदघाटन साठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून बुरोंडी गावचे सरपंच प्रदीपजी राणे, उपसरपंच नितीनजी लखमजे , शिवसेना बुरोंडी विभाग प्रमुख सुनीलजी कुळे, बस स्टॉप ठेकेदार सुभाष घुबडे आणि कारागीर संदीप घुबडे यांनी फार कमीतकमी खर्चात आणि आराखड्याप्रमाणे सुंदर काम केले त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
गावातील ज्येष्ठ नागरिक गोविंद साठेजी यांच्या हस्ते उदघाटन सोहळ्याचा नारळ फोडण्यात आला. मैथिली रघुनाथ गोवले तसेच वरील सर्व देणगीदार यांच्या हस्ते फित कापण्यात आली. सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असा हा कार्यक्रम होता. उदघाटन सोहळ्यास वाडीतील ग्रामीण व मुंबई वरून आलेल्या ग्रामस्थाची संख्या बहुसंख्य होती, महिला वर्गाचे छान सहकार्य व तरुण मुला मुलींचे विशेष सहकार्य लाभले
ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत गोवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खूप छान पद्धतीने केले अश्या पद्धतीने अगदी व्यवस्थितरित्या उदघाटन सोहळा पार पडला.