मालाड, ता.26 (वार्ताहर) : वाढती महागाई, पेट्रोल,डिझेल आणि खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतीने सर्व सामान्य माणूस हवालदिल झाला आहे.या विरोधात आज राष्ट्र सेवा दल, सिपीआय, सिपीएम,आपच्या वतीने मालवणी, मालाड येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, औद्योगिक प्रगती, शेती विकास यासारखे अनेक क्रांतिकारी निर्णय घेणारे रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून राष्ट्र सेवा दल मालवणीच्या वतीने वाढत्या महागाई आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात समविचारी पक्ष आणि संघटना सोबत मालवणी गेट क्रमांक 1 येथे जाहीर धरणा आंदोलन केले.
राष्ट्र सेवा दल, मालवणी, मालाड, सीपीआय, सीपीएम,आणि आम आदमी पार्टी यांच्या सहयोगाने झालेल्या महागाई विरोधी आंदोलनात आवाज उठविण्यात आला. या वेळी राष्ट्र सेवा दलाचे संघटक निसार अली सय्यद, मनोज परमार, जहिदा शेख,(सोनू), प्रकाश जैस्वार, सुमन कडलक, सोनल मुखीया, मनीषा कासारे, निकोलस पटेल, कुसुम सिंग, तब्बसुम शेख यांच्यासह सिपीएम चे कॉम्रेड ए. सी. श्रीधरन, मुश्ताक मेस्त्री, सिपीआय चे कॉम्रेड चारुल जोशी, रईस शेख, आम आदमी पार्टीच्या लारझी व्हर्गिस, हाजी मकसूद मुल्ला, महेश चावडा, एडव्होकेट सईद शेख काँग्रेस चे अब्राहम तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .