मालाड, ता.13 (निसार अली) : महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक होत असल्याचे पहायला मिळत आहे. आज मालाडमध्ये अनोखे आंदोलन करत इंधन दरवाढीच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले.मुंबई कॉग्रेस तसेच सर्व सेलच्या वतीने दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता एक रुग्ण हातगाडीवर झोपलेला आहे आणि त्याला सलाईन तेथेच लावण्यात आले आहे, असा खराखुरा देखावा दाखवण्यात आला तर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल थाटून भाकऱ्या शेकल्या आणि केंद्रातील सरकारचा विरोध केला.
मुंबई कॉग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मंत्री अस्लम शेख, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या सूचनेनुसार उत्तर मुंबई जिल्हा ब्लॉक क्रमांक 46 मध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच मोदी सरकार विरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करत आंदोलकांनी त्वरित इंधन दर वाढ मागे घ्या व इतर गृहउपयोगी वस्तूंचे ही दर कमी करा, अशा मागण्या केल्या.
प्रसंगी मुंबई काँग्रेस सचिव संतोष चिकणे यांनी केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला तसेच जर दर कमी झाले नाही तर सामान्यजन रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.
महासचिव डॉ. नेकसन नाटके, मेहबूब खामकर, ब्लॉक अध्यक्ष रवींद्र मोगरे, मुरगन पिल्लई, रोशन कांबळे, पूजा जवेरी,महेश धावडे, मुरुगन पिल्लई, संगीता अँटनी, संध्या नाझरे,वैशाली तांबोळी, पंकज कपूर, कैलास आंबरे, सागर चेउलकर,विनय गोताड,विवेक पाडावे,दत्ता पाटील,कल्पेश मोरे,साहिल साळवी, प्रेम धोत्रे, प्रमोद भोसले,सचिन मसलकर रवी भील,जयेश पटेल, अमर ठाकोर आदी यावेळी उपस्थित’होते.















