मुंबई : मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेड या मुंबईतील आघाडीच्या अॅसेट फायनान्स कंपनी आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केले असून, वितरण, मार्जिन व नफा यामध्ये चांगली वाढ नोंदवली आहे. वितरणामध्ये तबब्ल 34% वाढ झाली, तिमाहीत नेट इंटरेस्ट मार्जिन (एनआयएम)70 वाढून 9% झाले. कंपनीने आर्थिक वर्ष 19 मधील पहिल्या सहामाहीत 140 कोटी रुपये करोत्तर नफा मिळवला. अगोदरच्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत त्यात 29% वाढ झाली. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत, कंपनीच्या अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) मध्ये वार्षिक 6% म्हणजे 16,623 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.
कंपनीच्या नेट एनपीएमध्ये (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स) अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीतील 6.8%च्या तुलनेत 4.4% पर्यंत घट झाली. प्रोव्हिजन कव्हरेज रेश्यो (पीसीआर) 56.5% होता. कंपनीने स्टँडर्ड अॅसेट्स पोर्टफोलिओमध्ये 2.5% हे सर्वाधिक प्रोव्हिजनिंगमधील एक हे स्थान कायम राखले.
व्हेइकल फायनान्स वितरणाने तिमाहीमध्ये 21% इतकी वार्षिक वाढ नोंदवली. व्यावसायिक वाहनांमध्ये झालेली 62% वाढ व युज्ड अॅसेट्स सेग्मेंटमधील 33%वाढ, यामुळे त्यास चालना मिळाली.
मॉर्गेज व्यवसायामध्ये, कंपनीच्या “गो होम लोन” व “गो डायरेक्ट” या धोरणामुळे गृह कर्ज श्रेणीतील वितरणामध्ये तब्बल 219% वाढ झाली व डायरेक्ट ओरिजिनेशनमध्ये मोठी, म्हणजे अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीतील 32%च्या तुलनेत आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत 78% पर्यंत वाढ झाली.आता 10 राज्यांतील 93 ठिकाणी कार्यरत असलेली कंपनी नॅशनल अफोर्डेबल हौसिंग फायनान्स कंपनी म्हणून स्वतःचे स्थान पुन्हा निर्माण करण्यासाठी परिवर्तन आणण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे.
एसएमईंना दिल्या जाणाऱ्या कर्जांचे योगदान लक्षणीय राहिले आणि त्यांनी आमच्या सर्व उत्पादनांमध्ये सर्वाधिक नफा नोंदवला. एसएमई व्यवसायाच्या वितरणामध्ये वार्षिक 67% वाढ झाली व देशात विविध ठिकाणी विस्तार करण्यात आला. वाढीची हीच गती यापुढेही कायम राहील, अशी कंपनीला अपेक्षा आहे. कंपनी एमएसएमईंसाठी क्रेडिट इंजिन व फिनटेक यावर आधारित सेवा निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहे.
जनरल इन्शुरन्स व्यवसायामध्ये, मॅग्मा एचडीआयने आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत जीडब्लूपीमध्ये 68% वाढ साध्य केली. मोटर इन्शुरन्स हे कंपनीचे बलस्थान राहिले व त्याने कंपनीच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये 78% योगदान दिले. या उद्योगातील सर्वात कमी ओन डॅमेज लॉस रेश्योमध्ये कंपनीचाही समावेश आहे. 30 जून 2018 पर्यंत, देण्यात आलेल्या प्रत्येक 10,000 योजनांच्या बाबतीत ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींची सर्वात कमी संख्या, या संदर्भात कंपनी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे आयआरडीएने जाहीर केलेल्या माहितीतून स्पष्ट होते.
कंपनीच्या कामगिरीविषयी बोलताना, मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय चाम्रिया यांनी सांगितले, “रिटेल फायनान्सिंग व्यवसायात अंदाजे तीन दशकांचा अनुभव असणारी मॅग्मा काही महत्त्वाच्या घटकांच्या मदतीने शाश्वत दीर्घकालीन व्यवसाय व उत्पन्नातील वाढ यामध्ये सातत्य राखणार असून, हे घटक आहेत – एबीएफमधील उत्पादनांची पुन्हा आखणी करणे, परवडणाऱ्या गृहकर्जांवर भर देणे व हौसिंग सेग्मेंटमध्ये डायरेक्ट सोर्सिंग, अतिशय नफ्यातील एसएमई बुक निर्माण करणे, विमा व्यवसायात उत्तम प्रगती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्व व्यवसायांमध्ये गुणवत्ता राखणे”.
एनबीएफसी व एचएफसी यांच्यावर परिणाम करत असलेल्या सध्याच्या रोखतेच्या स्थितीविषयी बोलताना चाम्रिया यांनी नमूद केले, “सध्या बाजारात अतिशय अनिश्चितता आहे. माहीत नसलेल्या गोष्टींबाबत भीती वाढली असून, एकंदर आत्मविश्वासावर परिणाम झाला आहे.”