देशातील 8 राज्ये आणि नागरिक समूहांपर्यंत पोहोचणार हे अभियान
मुंबई, 28 जुलै : मँग्रोव्ह्ज इकोसिस्टीम जतन करण्याचा संदेश देणाऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त गोदरेज अँड बॉइस मॅन्युफॅक्चरिंग कं. लि. ने डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्या सहकार्याने (वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर, इंडिया) ‘मॅजिकल मँग्रोव्ह्ज’ हे राष्ट्रीय अभियान लाँच केले आहे, जे सध्याच्या काळात मँग्रोव्ह्ज संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करते आणि नागरिकांना जतन चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हे अभियान देशातील आठ राज्यांत पोहोचणार असून त्यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळ नाडू, केरळ, ओडिशा आणि पश्चिम बंगाल यांचा त्यात समावेश आहे. या राज्यांत मँग्रोव्हज इकोसिस्टीम किती महत्त्वाची आहे या विषयी जागरूकता निर्माण केली जाणार असून नागरिकांना त्याचा प्रसार करण्यासाठी स्वयंसेवकाची भूमिका दिली जाईल. हे स्वयंसेवक सहा महिन्यांसाठी काम करतील व त्या कालावधीत वेबिनार्स, सिनेमाचे स्क्रिनिंग, ऑनलाइन स्पर्धा, डिजिटल कथाकथन अशा उपक्रमांत सहभागी होतील.
गेल्या काही दशकांमध्ये गोदरेज अँड बॉइजसची पाणथळ व्यवस्थापन सेवा टीम मुंबईतील विक्रोळी येथे असलेल्या सर्वात मोठ्या मँग्रोव्ह्जपैकी एकाचे सक्रिय व्यवस्थापन आणि संवर्धन करत आहे. आपले प्रयत्न आणखी उंचावर नेण्यासाठी गोदरेजने डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाबरोबर सहकार्य केले असून त्याअंतर्गत संवर्धनाचे प्रयत्न आणखी मजबूत केले जातील, तर देशभरात जागरूकतेचा प्रसार आणखी व्यापक केला जाईल. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया गेल्या दोन दशकांपासून देशभरातील समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या जागा, पुराची ठिकाणे, शहरी केंद्रे आणि रामसार साइट्स इत्यादी ठिकाणच्या पाणथळ जागांचे संवर्धन करत आहे.
या उपक्रमाविषयी डॉ. फिरोझा गोदरेज म्हणाल्या, ‘गोदरेज अँड बॉइसने विविध प्रसंगी डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाबरोबर सहकार्य केले आहे. या उपक्रमाद्वारे आमची ताकद एकत्रित करता येईल आणि मँग्रोव्ह्जचे संवर्धन करण्यासाठी समाजाला व्यक्तीगत पातळीवर करता येऊ शकणाऱ्या छोट्या प्रयत्नांतून कशाप्रकारे पर्यावरणात मोठा बदल घडवता येईल हे समजावून देता येईल. ’
डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी सिंग म्हणाले, ‘ मँग्रोव्हज निसगर्तःच वातावरणातील बदलांना विरोध करतात करतात आणि कित्येक जलचर पेशींना प्रजजनासाठी जागा देतात. मातीची धूप होण्यापासून रोखण्यावर त्यांचा होणारा परिणाम आपल्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वाभाविक रचनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तरुण पिढ्या आणि जागरूक नागरिकांची भारताच्या निसर्ग संवर्धनातील महत्त्वाची भूमिका लक्षात घेत हे अभियान मँग्रोव्ह्जसारख्या महत्त्वाच्या आणि नाजकर इकोसिस्टीमविषयी जागरूकता पसरवण्याचे व पर्यायाने त्यांच्या संवर्धनात सकारात्मक कृती घडवून आणण्याचे ध्येय या अभियानाने ठेवले आहे. ’
गोदरेजमधील पाणथळ व्यवस्थापन टीम विविध उपक्रमांतून मँग्रोव्ह्ज इकोसिस्टीमविषयी जागरूकता निर्माण करत असून त्यात 11 भाषांत उपलब्ध असणारे, अशाप्रकारचे एकमेव मँग्रोव्ह्ज मोबाइल अप, गेल्या वर्षी लहान मुलांसाठी लाँच करण्यात आलेले अभिनव पुस्तक आणि मुंबईतील विविध शैक्षणिक संस्थात पोस्टर प्रदर्शन यांचा त्यात समावेश आहे.
‘मॅजिकल मँग्रोव्ह्ज’ या अभियानाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या, www.mangroves.godrej.com
या चळवळीत डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी नोंदणी करा http://volunteers.wwfindia.org/project.php?pid=401