रत्नागिरी : अंगणात शिरलेल्या मोठया मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले. चिपळूण तालुक्यातील खडपोली येेेथील तळ्याची वाडी येेेथे ही घटना घडली. अरविंद बापट यांच्या अंगणात ही मगर येऊन बसली होती. बापट यांना ती दिसल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाच्या हेल्पलाईनवर फोन केला. तातडीने वन विभागाचे कर्मचारी रामदास खोत, दत्ताराम सुर्वे व वन्यजीवप्रेमी ओंकार बापट यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने शिताफीने मगरीला पकडून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.