डोंबिवली : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी 6:45 ते 7:15 पर्यंत कल्याणहुन मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे सेवा सुमारे 30 ते 45 मिनिटे विस्कळीत झाली होती. सतत होणाऱ्या बिघाडामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून रोज मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार रिप-रिप पडणाऱ्यापावसामुळे आधुनिक यंत्रणेत बिघाड होतो व सिग्नल यंत्रणा बंद पडते. प्रवासी बिघाडामुळे त्रस्त असून ऑफिस जाण्यास किंवा संध्याकाळी घरी पोहोचण्यास विलंब होत आहे.