
मुंबई, ता.18, (निसार अली) : समाजवादी नेते मृणाल गोरे, बाबूराव सामंत यांचे सहकारी मधु आडेलकर यांचे दीर्घ आजाराने आज गोरेगाव येथे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
ते क्रांती तीर्थ अंदमानचे लेखक होते. अंदमान निकोबार येथील सेल्युलर जेल येथील 1857 पासूनच्या अज्ञात भारतीयांची संशोधनात्मक माहिती जमा करून त्यांनी लेखन केले होते. भारतीय स्वातंत्र लढ्यातील राजबंदी व हुतात्मे यांची यादी बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. तसेच मालवण येथे नाथ पै सेवांगण संस्थेचे संस्थापकही होते. त्यांच्या पश्चात 4 मूली-जावई आणि नातवंड असा परिवार आहे.














