मुंबई, (निसार अली) : अनेक वर्षांपासून मढ जेट्टी ते पास्कल वाडी या परिसरात भेडसावणारा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांची होणारी पायपीट थांबणार आहे. येथील पाणीप्रश्न सुटावा, यासाठी नगरसेविका संगीता सुतार यांनीही प्रयत्न केले होते. नुकतीच पालिका जल विभागाकडून पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीची चाचणीही करण्यात आली. या चाचणीच्या वेळी समाजसेवक संजय सुतार, नितीन कासकर आदी उपस्थित होते. पाणीप्रश्न सुटल्याने रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.