
मुंबई : ॐ विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या संस्थापिका व सचिव मा. गुरुवर्या श्रीमती अनुपमा मधुकर नार्वेकर मॅडम यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अस्मिता कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयाच्या प्रांगणात दि. १९/०२/२०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत संपन्न झाला. सदर कार्यक्रमास ४५० लोकांची उपस्थिती होती. त्यात संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनिषा प्रणिल नायर मॅडम, उपाध्यक्षा संजीवनी संजय रुमडे मॅडम, कार्यवाह अस्मिता सुजित खोचरे मॅडम व खजिनदार तृप्ती राहुल वाघधरे मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्ग व विदयार्थी विदयार्थिनी यांची उपस्थिती तर होतीच परंतु अनेक मान्यवरांची उपस्थितीही होती. त्यात मा. डॉ. रविंद्र कुलकर्णी (कुलगुरु मुंबई विदयापीठ), मा. डॉ. अजय आमरे (प्र. कुलगुरू, मुंबई विदयापीठ), मा. सुनीलभाऊ राऊत (आमदार, विक्रोळी विधानसभा मतदार संघ), मा. कपिल पाटील (माजी शिक्षक आमदार मा. जगताप सर व मा. नगरसेवक उपेंद्र सावंत (विक्रोळी), माजी नगरसेवक मंगेश सांगळे, माजी नगरसेवक चंद्रकांत निरभवणे, माजी नगरसेविका मनिषा रहाटे, माजी नगरसेवक दिलीप हजारे, विदया विकास एज्युकेशन सोसायटीचे चिटणीस मा. डॉ. विनय राऊत सर व विश्वस्त मा. डॉ. मेघा शेट्टी तसेच मिलिंद विदयालयाचे अध्यक्ष मा. श्री. सदानंद रावराणे सर, अभय शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. तुषार गायकवाड सर त्याचप्रमाणे अनेक संस्थाचालक या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नार्वेकर मॅडमच्या स्मृतींना उजाळा देऊन मनःपूर्वक श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील थोर कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमात मा. गुरुवर्या श्रीमती अनुपमा नार्वेकर मॅडमच्या आठवणी असलेल्या स्मृतिगंध विशेषांक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले व त्या पुस्तकाच्या प्रती व मॅडमचे स्मृतिचिन्ह सर्व उपस्थितांना भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी मॅडमच्या स्मरणार्थ दोन कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कर्ष बालमंदिर या शाळेतील २० विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली.
मॅडमच्या जीवनावर तयार केलेली चित्रफीत पाहून उपस्थित सर्वच जण भावूक झाले. शिक्षण क्षेत्रात मोलाची व भरीव कामगिरी करणाऱ्या या शिक्षण तपस्विनीला सर्वानीच जड अंतकरणाने आदरांजली अर्पण केली. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.