
दापोलीचे आमदार संजय कदम यांनी मत्स्य विभागाचे आयुक्त यांची भेट घेतली.
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): पारंपारिक आणि पर्ससीननेट धारक मच्छिमारांमध्ये यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. एलईडीलाईटद्वारे केल्या जात असलेल्या मच्छिमारीवरून हा वाद सुरु झाला आहे.
पारंपारिक मच्छिमारांनी पर्ससीननेट धारक मच्छिमार एलईडी लाईटवरून मच्छिमारी करत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत दापोली तालुक्यातील हर्णे इथल्या पारंपारिक मच्छिमारांनी दापोलीचे आमदार संजय कदम यांच्या मत्स्य विभागाचे आयुक्तांची भेट घेऊन त्यांना घेराव घातला. दरम्यान पर्ससीननेटधारक मच्छिमारही मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकले. पर्ससीन मच्छिमार कायद्याच्या कक्षेत राहून एलईडी लाईटवर मच्छिमारी करत असल्याची बाजू पर्ससीन मच्छिमारांनी मत्स्य आयुक्तांकडे मांडली. पारंपारिक आणि पर्ससीन मच्छिमारांची बाजू मत्स्य आयुक्तांनी ऐकून घेतली. मात्र या दोघांच्यात मत्स्य आयुक्तांची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र केंद्र सरकारच्या आदेशानुसार फक्त एसक्युझीव्ह एकाॅनाॅमिक झोन अर्थात १२ नाॅर्टिकलच्या बाहेर एलईडी लाईट वापरून मासेमारी करण्यास बंदी असल्याचं मत्स्य आयुक्तांकडून सांगण्यात आलं. १२ नाॅर्टिकलच्या आत एलईडी लाईट वापरण्यास बंदी संदर्भात राज्य सरकारचे आदेश नसल्याचं मत्स्य आयुक्तांनी सष्ट केलं. त्यामुळेच १२ नाॅर्टिकलच्या आत एलईडी लाईट वापरण्यास मत्स्य आयुक्तांनी मुदतवाढ द्यावी अशी मागणी पर्ससीन नेट धारक मच्छिमारांनी केली आहे. मात्र एलईडी लाईट वरून पेटलेला पारंपारिक मच्छिमार आणि पर्ससीन नेट धारक मच्छिमारातील वाद आता आणखी भविष्यात पेटणार एवढं मात्र नक्की.