मुंबई, 27 may : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांची ‘सावली’, वंचित बांधवांची ‘माऊली’ माता रमाईंच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
माता रमाई यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणतात, माता रमाई म्हणजे दिनदुबळ्यांची आई, त्यागाची मूर्ती, माता रमाईंनी प्रचंड कष्ट, गरीबीचे चटके सहन करत डॉ. बाबासाहेबांना समर्थ साथ दिली. डॉ. बाबासाहेबांच्या महामानवापर्यंतच्या प्रवासातील त्या प्रमुख साथीदार बनल्या. माता रमाई नसत्या तर कदाचित डॉ. बाबासाहेब घडले नसते. डॉ. बाबासाहेबांना महामानव पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या आमच्या माता रमाईंना त्रिवार वंदन.