
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य करणार्या ‘कलाश्रम’ च्या वतीने अभिनव मासिक स्पर्धा घेतली जाते. यावेळी विद्यार्थीप्रिय शिक्षिका सुविद्या दत्तात्रय तळेकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘माँ तुझे सलाम’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्राच्या अंतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था कार्य करते. या महिन्यात घेण्यात येणारी ही स्पर्धा ‘कलाश्रम’ ची एकोणचाळीसावी विनामुल्य स्पर्धा आहे. स्पर्धकाने आपल्या आईसोबतचे जुने-नवीन किंवा नुकतेच काढलेले स्वत:चे छायाचित्र सोबतच्या 9869008805 या वॉट्सअपवर पाठवायचे आहे. हे छायाचित्र पाठवताना सोबत त्या छायाचित्राला समर्पक अशा फक्त दोन काव्याच्या मराठी ओळी कोर्या कागदावर लिहून पाठवायच्या आहेत. त्यावर ‘सोबतचा फोटो माझ्या आईचा आहे’ असे स्पर्धकाने लिहिणे गरजेचे आहे. संपूर्ण नाव, रहाते ठिकाण, मोबाईल क्रमांक आणि खाली स्वाक्षरी हे लिहिलेल्या कागदाचा फोटो सोबतच्या छायाचित्रासोबत पाठवायचा आहे. स्पर्धेची अंतीम तारीख 15 जानेवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. दोन विजेत्यांची या स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय अशी निवड केली जाईल. विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र मुंबईत होणार्या ‘अभियान सन्मान’ या कार्यक्रमात दिले जाईल. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांच्याशी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.