
मुंबई २३ जून २०२२ – एल अँड टी एनर्जीच्या हायड्रोकार्बन विभागाने एका प्रतिष्ठित परकीय कंपनीकडून तीन ऑफशोअर पॅकेजेस मिळवली आहेत. त्याअंतर्गत कंपनीला विविध नव्या ऑफशोअर जॅकेट बांधकामाचे इंजिनियरिंग, आवश्यक खरेदी, बांधकाम आणि इन्स्टॉलेशन करून द्यायचे आहे. एल अँड टी एनर्जी हायड्रोकार्बनने (एलटीईएच) यापूर्वीही या ग्राहकासाठी कंत्राटाची अमलबजावणी केली होती आणि परत मिळालेला व्यवसाय हे एल अँड टीचे ‘गुणवत्तापूर्ण अमलबजावणी’चे तत्व अधोरेखित करणारे आहे.
एलटीईएच सध्या विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ऑफशोअर प्रकल्पांची अमलबजावणी करत असून कंपनी विविध ठिकाणी आपले प्रादेशिक अस्तित्व विस्तारण्यासाठी बांधील आहे. त्यासाठी कंपनीद्वारे स्थानिक कौशल्य व गुणवत्तेला प्राधान्य देणे, स्थानिक पुरवठादारांकडून खरेदी करणे, स्थानिक कंत्राटदारांना शाश्वत काम देत व्यावसायिक हितसंबध स्थापन करणे यावर भर दिला जातो.
ऑफशोअर, ऑनशोअर, बांधकाम सेवा, मॉड्युलर फॅब्रिकेशन आणि अडव्हान्स्ड व्हॅल्यू इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजी (अडव्हन्ट) विभागअंतर्गत संघटित असलेल्या एलटीईएद्वारे देशांतर्गत आणि परदेशी ग्राहकांना हायड्रोकार्बन क्षेत्राशी संबंधित सर्वसमावेशक आणि डिझाइन टु बिल्ट सुविधा दिल्या जातात. तीन दशकांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर कंपनी प्रकल्प व्यवस्थापन, कॉर्पोरेट प्रशासन, दर्जा, एचएसई आणि कार्यकारी गुणवत्ता क्षेत्रांत जागतिक मापदंड तयार करत आहे.
पार्श्वभूमी:
लार्सन अँड टुब्रो ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी जगभरातील ५० देशांत कार्यरत आहे. दमदार, ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि उच्च दर्जाचा सातत्यपूर्ण ध्यास यांमुळे एल अँड टी गेल्या आठ दशकांपासून प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान टिकवून आहे.















