
मुंबई: कोरोना विरोधी लढ्यात मदत करण्याच्या हेतूने, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन आणि वित्तीय सेवा पुरवणारा भारतातील आघाडीचा कंपनी समूह असलेल्या, लार्सन अँड टुब्रो, यांनी ‘एन 95 मास्क’ आणि कोव्हीड डायग्नोस्टिक किटसह महाराष्ट्र सरकारला वैद्यकीय मदत देऊ केली आहे.
वैद्यकीय कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक 48,००० पेक्षा जास्त एन 95 मास्क एल एन्ड टी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला देणगी देणार असून, राज्यातील ५,००० व्यक्तींवर कोरोना चाचणी घेण्यास सक्षम असे ५० डायग्नोस्टिक किट्स देखील देणगी देणार आहे. यामुळे राज्यातील अधिकाधिक रहिवाशांची चाचण्या घेण्याची राज्य सरकारची क्षमता वाढेल.
याआधीच कंपनीने मार्च ३० रोजी पीएमकेअर्स फंडासाठी १५० कोटी रुपयांची देणगी दिली असून, देशभरातील आपल्या 160,000 कंत्राटी कामगारांना आधार देण्यासाठी रुपये 500 कोटीची प्रति माह तरतूद केली आहे. महाराष्ट्राला देण्यात येणारी वैद्यकीय मदत ही या दोन्ही मदतीपेक्षा अतिरिक्त आहे.
केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांना चालना देत असल्याने भारत कोविड १९ जागतिक साथीचा सामना करीत आहे. कॉर्पोरेट, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स, स्वयंसेवी संस्था या साथीच्या रोगाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी देशभर मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सुरुवातीला कोरोना संक्रमणाचे निदान करण्यासाठी भारतात महागड्या आयात केलेल्या किटचा वापर केला जात होता. परंतु, एल एन्ड टी कंपनीने पुणेस्थित मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने विकसित केलेले मेक इन इंडिया, कोरोना निदान चाचणी किट्स खरेदी केले असून. यातील प्रत्येक किट 100 चाचण्या घेण्यास सक्षम आहे, तसेच निकाल येण्यासाठी जास्त कालावधी घेणाऱ्या इतर आयातीत किटच्या तुलनेत फक्त 2.5 तासांत मायलॅब किट संक्रमण शोधण्यास सक्षम आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की कोरोनाव्हायरसची लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे ही या लढाईतील सर्वात महत्वाची उपाययोजना आहे. परंतु जगाकडे निदान चाचणी किटचा अभाव आहे आणि संशयित प्रकरणे शोधण्यासाठी जगभरातील प्रयोगशाळा कमी क्षमतेने व्यवस्थापन करीत आहेत. कोरोना संक्रमण शोधण्यासाठी देशात अधिकाधीक चाचणी किट तैनात करण्यास प्रयत्न होत असून, एल एन्ड टी सारख्या कंपनी देखील या कामी हातभार लावत आहेत.
एल अँड टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी एस एन सुब्रह्मण्यन म्हणाले: “आम्ही या कठीण समयी केंद्र आणि राज्य सरकार सोबत आहोत आणि कोरोनाच्या साथीच्या विरोधात भारताच्या लढ्यात सर्व शक्तीनिशी मदत देऊ करत आहोत. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून आम्ही महाराष्ट्रात एन 95 मास्क तसेच निदान चाचणी किट्स उपलब्ध करून देत आहोत, जे साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यास प्रशासनाला उपयुक्त ठरतील. पीएम-केअर्स फंडासाठी १५० कोटी रुपयांची मदत याआधीच आम्ही दिली असून, यापुढेही या लढ्यात प्रशासनाला आम्ही अधिक वैद्यकीय पुरवठा उपलब्ध करून देऊ.”
















