या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी
मुंबई, २ ऑगस्ट २०२२ – लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या ईपीसी प्रकल्प, हाय टेक उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीने इंजिनियरिंग न्यूज रेकॉर्ड (ईएनआर), न्यू यॉर्क या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या ‘टॉप २०० एनव्हॉरमेंटल फर्म्स’च्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. या यादीतील एकमेव भारतीय कंपनी ठरलेल्या एल अँड टीचे २०२१ मधील पर्यावरणपूरक उत्पन्न ४.८३ अब्ज डॉलर्स होते व त्याचा कंपनीच्या एकूण उत्पन्नातील वाटा ३० टक्के आहे.
क्षेत्राप्रमाणे कंपन्यांच्या उत्पन्नातील क्षेत्राप्रमाणे हिश्श्यानुसार ईएनआरने केलेल्या विभागीकरणात एल अँड टीला हवेचा दर्जा /हरित उर्जा आणि जल उपचार/पुरवठा राखणारे प्रकल्प अशा दोन्ही यादीत तिसरे स्थान मिळाले आहे. एल अँड टीने २०२१ मध्ये एकूण ४.८३ अब्ज डॉलर्सचे पर्यावरणपूरक उत्पन्न मिळवले असून या दोन विभागांतील प्रकल्पांचा त्यात ६७ टक्के वाटा आहे.
आणखी एक लक्षणीय मुद्दा म्हणजे ग्राहकांनुसार उत्पन्नाचे विभागीकरण केल्यानंतर एल अँड टी फेडरल गव्हर्नमेंट या आपल्या ग्राहकाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर, तर राज्य/स्थानिक सरकार ग्राहक असताना दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकंदरीत एल अँड टीच्या उत्पन्नाचा ९४ टक्के भाग फेडरल गव्हर्नमेंट आणि राज्य/स्थानिक सरकारकडून येतो. यातून एल अँड टीचे पर्यावरणपूरक उत्पन्न सरकारच्या पर्यावरणस्नेही पद्धती व अशा पद्धतींना अनुकूल धोरणांशी मोठ्या प्रमाणावर सुसंगत असल्याचे अधोरेखित होते.
या घडामोडीविषयी एल अँड टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एस एन सुब्र्हमण्यन म्हणाले, ‘इतक्या वर्षांत कार्बन उत्सर्जन कमी करण्याची बांधिलकी जपत आम्ही स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यनिर्मितीसाठी लक्षणीय गुंतवणूक केली आहे. आमच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतलेली पाहाणं आनंददायी आहे. त्याहीपेक्षा आनंदाची बाब म्हणजे एकूण उत्पन्नात आमच्या पर्यावरणपूरक उत्पन्नाचा हिस्सा लक्षात घेता आम्हाला तिसरे स्थान मिळाले, तर पहिल्या आणि रँक होल्डर्सची अशीच आकडेवारी पाहिल्यास हा वाटा अनुक्रमे १०० टक्के आणि ५१ टक्के आहे. याचा अर्थ आम्हाला पुढील वर्षांत अधिक चांगले आंतरराष्ट्रीय रँकिंग्ज मिळवण्यासाठी बराच वाव आहे. हरित हायड्रोजेन आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे आमचे प्रयत्न याला नक्कीच चालना देतील.’
ईएसजी बांधिलकीचा एक भाग म्हणून एल अँड टीने २०३५ पर्यंत वॉटर न्युट्रलिटी, तर २०४० पर्यंत कार्बन न्यूट्रलिटी साध्य करण्याचे ठरवले आहे. एल अँड टीचे हवामान बदल, उर्जा कार्यक्षमता आणि अक्षय उर्जा उपक्रम भारत सरकारने जारी केलेल्या नॅशनल अक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजशी (एनएपीसीसी) सुसंगत आहेत. कंपनीचे हे उपक्रम सीओपी २१- पॅरिस करारादरम्यान भारत सरकारने मंजूर केलेल्या नॅशनली डिटरमाइन्ड कॉन्ट्रिब्युशन्सशीही (एनडीसी) सुसंगत आहेत. बांधकाम क्षेत्रातील घडामोडी टिपणाऱ्या जगातील सर्वात अग्रेसर पब्लिकेशन्सपैकी एक असलेल्या ईएनआरद्वारे १९१७ पासून जगभरातील बांधकाम क्षेत्राला बांधकाम क्षेत्राशी संबंधित बातम्या, विश्लेषण, डेटा उपलब्ध करून दिला जातो.