मुंबई, १४ डिसेंबर २०२१: लार्सन अँड टूब्रोच्या बांधकाम शाखेला आपल्या बिल्डिंग्ज आणि फॅक्टरी व्यवसायासाठी ओडिशा सरकारकडून कटक मध्ये अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी क्लिनिकल ब्लॉक्स आणि त्याअनुषंगाने पायाभूत सुविधा उभारण्याकरता मोठे कंत्राट मिळाले आहे. या ईपीसी प्रकल्पाचा कालावधी ३० महिन्यांचा आहे.
या प्रकल्पामध्ये चार क्लिनिकल ब्लॉक्स (बी+जी+९ मजले)चे बांधकाम समाविष्ट असून संयुक्त आराखडा यंत्रणा आणि इतर पूरक इमारती असे एकूण बांधकाम क्षेत्र ३.४ दशलक्ष चौरस फूट आहे. या अद्ययावत रुग्णालयात न्युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, एंडोक्रोनोलॉजी, गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, हेमेटोलॉजी, कार्डीओलॉजी, सर्जिकल ब्लॉक्स, कॅज्यूअल्टी, ट्रोमा हे विशेष विभाग आणि सर्वसाधारण शस्त्रक्रिया विभाग यांसह एकूण २०५८ खाटांची सोय असेल.
कामाच्या स्वरूपात स्थापत्य रचना आणि कार्यवाही, रचना- संयुक्त यंत्रणा, इलेक्ट्रिकल, व्हीएचटी, डेटा व्होईस, बीएमएस, एसीएस, सीसीटीव्ही, एव्ही, पीएमएस, एनसीएस, क़्युएमएस, एएमएस यांसह असलेली इएलव्ही यंत्रणा, कार पार्क व्यवस्थापन यंत्रणा, मालमत्ता व्यवस्थापन यंत्रणा, पीएचई यंत्रणा, एचव्हीएसी, एफपीएस सह पाणी व्यवस्थापन यंत्रणा, उच्च व्हेलॉसिटी वॉटर स्प्रे आणि वायू दाब यंत्रणा, एमजीपीएस, वाफेचे बॉयलर्स, एलपीजी, स्वयंपाकघर आणि लौंड्री साहित्य, स्वयंचलित कचरा आणि लौंड्री यंत्रणा, वैद्यकीय न्यूमॅटीक ट्यूब यंत्रणा, मोड्युलर एकात्मिक ओटी, बीएमयू यंत्रणा, अंतर्गत काम आणि ऊर्जा सक्षमतेसाठी सौर पॅनेल्स या सगळ्याचा समावेश आहे. व्हीएचटी, लँडस्केप, एफएएस, एसीएस, सीसीटीव्ही, एव्ही आणि एएमएस या सगळ्यांची ५ वर्षांची देखभाल हेही कामाच्या स्वरूपात अंतर्भूत आहे.
पार्श्वभूमी:
लार्सन अँड टूब्रो ही ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा यांमध्ये कार्यरत असणारी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरात ५० हून अधिक देशांमध्ये कंपनीचे काम चालते. मजबूत ग्राहक केंद्री दृष्टीकोन आणि सर्वोत्तम गुणवत्ता राखण्याची सातत्यपूर्ण आस यातून एल अँड टी ला त्यांच्या सगळ्या महत्वाच्या व्यवसायात गेली आठ दशके नेतृत्व करत आघाडीवर राहणे शक्य झाले आहे.
प्रकल्प वर्गवारी
वर्गवारी | ठळक | मोठे | महत्वाचे | मेगा |
मूल्य कोटी रुपयांमध्ये | 1,000 to 2,500 | 2,500 to 5,000 | 5,000 to 7,000 | >7,000 |