मुंबई – एल अँड टी कन्स्ट्रक्शन विभागाच्या पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवसायाला ओडिशा सरकारच्या जलस्त्रोत विभागाकडून क्लस्टर XIX आणि क्लस्टर XX मेगा लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाचे नव्याने कंत्राट मिळाले आहे.
या कंत्राटाअंतर्गत २३ लिफ्ट इरिगेशन योजनांच्या अमलबजावणी कामासह आनंदापूर लेफ्ट मेन कनाल, बिद्याधरपूर बराज, हदगड जलाशय, आनंदापूर बराज आणि खारसुआ, कानी आणि बैताराणी नद्यांच्या प्रदेशात विस्तारलेल्या इनटेक पॉइंट्सचा समावेश आहे. त्यामागे किओन्झर, जयपूर, केंद्रापाडा जिल्ह्यांतील २९,९१४ हेक्टर्स जागेचे जलसिंचन व लागवडयोग्य करण्याचा उद्देश आहे.
हे कंत्राट एल अँड टीची जलसिंचन श्रेत्रातील प्रतिष्ठा अधोरेखित करणारी तसेच या राज्यात शेती विकासासाठी हातभार लावण्याच्या कंपनीच्या क्षमतेवर ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
व्यवसायाने इतरही विविध अतिरिक्त आणि वैविध्यपूर्ण कंत्राटे मिळवली आहेत.