रत्नागिरी,(आरकेजी) : कारखान्यांचे दुषीत पाणी थेट वाशिष्ठि नदीत सोडले जात आहे. या कारणावरून लोटे औद्योगिक वसाहतीमधील ५६ कारखान्यांवर प्रदुषण नियंत्रण मंडळाने नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने दोन आठवड्यापुर्वी तपासणी केली होती. मंडळाचे सहसंचलक वाय. डी सोनटक्के यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या पथकात सहभागी झाले होते. पथकाने कारखान्यांची तपासणी केल्यानंतर तब्बल ५६ कारखान्यांवर नियमांचं उल्लघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे. पाच कारखान्यांना उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले असून एक्सेल इंडस्ट्रीजचा त्यात समावेश आहे. तर वीस कारखान्यांना प्रस्तावीत बंदचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.