रत्नागिरी (आरकेजी) : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, लोकशाहीचा जागर हा मतदानाच्या माध्यमातून होत असतो. ही देश घडविण्याची प्रक्रीया आहे आणि या प्रक्रीयमध्ये युवक-युवतीनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
नवनिर्माण महाविद्यालय येथे शुक्रवारी मतदान साक्षरता आणि मतदान जनजागृत्ती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. नवनिर्माण कॉलेजे चे चेअरमन अभिजीत हेगशेटये, प्रांतधिकारी अमित शेडगे, तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, नवनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे, नायब तहसिलदार गमरे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले भारतीय लोकशाहीला 70 वर्षे पुर्ण झाली आहे, आता आपली लोकशाही अधिकाधिक परिपक्व झाली आहे. त्यामुळे आता अधिक चांगली विचार, तीला अधिक चांगली दिशा देणे गरजेचे आहे. भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढविणे गरजेच आहे. मतदानाच्या प्रमाणात वाढ झाल्याने आपल्या देशाची लोकशाही अजून सदृढ होईल. लोकशाही, विधानसभा मतदान 2019 यावर्षात होणार असून या लोकशाही जागरामध्ये युवक-युवतींना उभे राहवायाचे असेल तर मतदार यादीत नाव नोदविणे गरजेच आहे. ते पुढे म्हणाले लोकशाही बळकट, सदृढ बनविण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढविणे गरजेच आहे आणि यासाठी 01 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत मतदान पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी महाविद्यालयातील ज्या तरुण-तरुणींचे 18 वर्षे वय पुर्ण झाले आहे आणि मतदार यादी नाव नोंदविले नाही अशा सर्वांनी नमुना सहा भरुन देऊन मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच ज्यांना 01 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहेत त्यांनाही भावी मतदार म्हणून या कार्यक्रमांतर्गत आपल नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे, तरी महाविद्यालयातील सर्वांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. पुढील वर्षी होणाऱ्या मतदानाचे घोष वाक्ये सुलभ मतदान हे असून दिव्यांगांनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदवावे. दिव्यांगांना मतदान करताना अडचण निर्माण होऊ नये यासाठी मतदार यादीत त्याची वेगळी नोंद घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदान जनजागृतीसाठी सर्व स्तरावरुन प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले बालकाकडून पालकांकडे या प्रक्रीयेंतर्गत आपण जिल्हातील जवळ जवळ 2 लाख विद्यार्थांना स्वत: पत्र लिहले असून त्या माध्यमातूनही चांगली जनजागृती झाली असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी नवनिर्माण महाविद्यालयाच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मतदान यादीत नाव नोंदविण्यासाठी 104 अर्ज सुपुर्त केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास या विषयावर यावेळी प्रभोदन केले. यावेळी नवनिर्माण महाविद्यालयाचे अध्यक्ष यांनी आपल्या महाविद्यालयातील 18 वर्षे पूर्ण झालेले तसेच 01 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या 100 टक्के विद्यार्थ्यांचे मतदान यादीत नोंदविण्यात येईल आणि या मतदानाच्या प्रक्रीयेपासून कोणीही वंचीत राहणार याची दक्षता घेण्यात येईल असे आश्वासनही यावेळी दिले. प्रास्ताविकामध्ये प्रांतधिकारी अमित शेडगे यांनी मतदान प्रक्रीया तसेच 01 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर2018 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी नवनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.