मुंबई : लोककलेचा पूर्वापार इतिहास तपासून पाहिला तर, लोकसंस्कृती हे मानवी जीवनाच्या जगण्याचे साधन होते. विरंगुळा म्हणून अविष्कार सादर करायचा आणि आत्मिक आनंद मिळवायचा असे काही दशकांपूर्वी त्याचे स्वरूप होते. पुढे माणसाची जीवनशैली बदलली आणि हीच लोकसंस्कृती त्यांच्या मनोरंजनाचे साधन झाले. आता मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत म्हणताना लोकसंस्कृतीचे स्वरूपही पूर्णपणे बदललेले आहे. आधुनिक बाज हा या लोकसंस्कृतीमध्ये डोकवायला लागलेला आहे. लोककलेचे कार्यक्रमसादर करणार्या संस्थांनाही प्रेक्षकांच्या अभिरूचीप्रमाणे बदलावे लागलेले आहे. महाराष्ट्रात अग्रगण्य अशा ज्या संस्था कार्यरत आहेत, त्यात कार्यकारी विश्वस्त असलेले संतोष परब यांच्या ‘महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास’ या संस्थेचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. गेले तीन दशके ही संस्था महाराष्ट्राबरोबर भारतातील प्रेक्षकांचे मनोरंजन करतेच परंतु लोककलेचा प्रचार आणि संवर्धन कसे होईल हेही पहात आलेले आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने मराठी प्रेक्षक एकवटला जातो. अमराठी प्रेक्षक कुतूहलापोटी अशा महोत्सवाला हजर रहातो आहे म्हटल्यानंतर परंपरेने आलेल्या लोककलांना प्राधान्य देणे या संस्थांना महत्त्वाचे वाटते. संतोष परब हे गेली एकोणवीस वर्षे ‘लोकरंग महोत्सवा’चे आयोजन करत आलेले आहेत.
यंदा एकोणीसावा महोत्सव २६, २७ आणि २८ जून २०१९ या दिवशी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात रोज रात्री ८.३० वाजता होणार आहे. त्यांच्याच लेखन-दिग्दर्शनात ‘श्री महाराष्ट्र देशा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकसंगीताचे आणि लोककलेचे दर्शन नृत्य-गायनाच्या माध्यमातून २६ आणि २८ जून या दिवशी घडवले जाणार आहे. प्रत्येकवर्षी नवीन अविष्कार हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य असते. २७ जूनला लोकसंगीतात वाजवल्या जाणार्या नव्या दुर्मिळ वाद्यांचा एकत्रित विलोभनिय अविष्कार ‘फोक वॅगन’ या शिर्षकात सादर केला जाणार आहे. मधुर पडवळ यांच्या संकल्पना, दिग्दर्शनात सादर केल्या जाणार्या कार्यक्रमात इतरही वाद्य कलाकारांचा सहभाग असणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याबरोबर सुर्यकांत भोईटे, मानव जाधव, दयानंद भोईटे, सागर आरबुने, यामिनी जाधव यांचा ‘लोकरंग महोत्सवा’ च्या आयोजनात सहभाग आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्याबरोबर अजय चौधरी, सुनिल शिंदे, आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, अरविंद भोसले, गोपाळ शेलार, सुनिल हळूरकर, विवेक देशपांडे, महादेव खैरमोडे, सुनिल चव्हाण, राजेश खाडे, आनंदराव माईंगडे, परिमल मेहता, राजेश पाटील, तुषार काळे, इंद्रजित सावंत, नितीन ठाकूर, अनिता खाडे, सायली परब, सुनिल मेहेतर, आरती कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी किसन जाधव, अशोक सावंत, बाळ खोपडे, राजू शेरवाडे, कोमल दळवी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. हा कार्यक्रमसर्वांसाठी विनामूल्य आहे.