रत्नागिरी : शासनकर्त्यांनी सोमवंशी अहवालाची बंधने लादून मच्छिमारांचा गळा दाबण्याचे कारस्थान केले आहे. त्या जाचक बंधनांचा तातडीने पूर्नविचार करून ती मागे घ्यावीत. अन्यथा मच्छिमारांवर शासन, प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईच्या विरोधात पुढचे पाऊल म्हणून येत्या लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा गंर्भित इशारा पर्ससीननेट मच्छिमार तालुका व जिल्हा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
पर्ससिन नेट मच्छिमारांवर नियमानुसार मच्छिमारी करूनही केल्या जाणाऱया कारवाईला तालुका व जिल्हा पर्ससिननेट मच्छिमार संघटनेने प्रशासनाच्या कारवाईविरोधात सडेतोड भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शनिवारी 23 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पर्ससिननेट मच्छिमारांची रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर बैठक पार पडली. या बैठकीला संघटनेचे जावेद होडेकर, विकास सावंत, नासीर वाघू, सुलेमान मुल्ला, विजय खेडेकर, इम्रान मुकादम, नाटे येथील आदम मुकादम आदी मच्छिमार पदाधिकाऱयांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्ससिननेट मच्छिमार आज नियमानुसार 12 नॉटीकल मैल बाहेरी खोल समुद्रात जावून मासेमारी करत आहेत. तरीसुध्दा प्रशासन या पर्ससीन नेट नौकांवर कारवाई केली जात असल्याचा आक्षेप पर्ससिननेट मच्छिमार संघटनांकडून घेण्यात येत आहे. राज्य मासेमारी अधिनियम 1981 नुसार ट्रॉलींग मासेमारीसाठीही नियम आहे. ट्रॉलिंग पध्दतीने मासेमारी करणाऱया नौकांवर या नियमानुसार शासनाने बंधने घातलेली आहेत. मात्र या अनधिकृत मासेमारी करणाऱया बोटींवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आक्षेप सुलेमान मुल्ला यांनी व्यक्त केला. आज पर्ससीन मच्छिमारांवर शासनाने सोमवंशी अहवाल लादून मोठा अन्याय चालवला आहेच. पण आज स्थानिक स्तरावर पर्ससीननेट मच्छिमारांवर पारंपारिक मच्छिमार संघटनेकडून नाना तऱहेचे आरोप केले जात आहे. आम्ही नियमानुसार मच्छिमारी करत असतानाही आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेण्याचा इशारा सुलेमान मुल्ला यांनी यावेळी दिला आहे.
ट्रॉलिंग व बुल ट्रॉलिंग तसेच एक व 2 सिलेंडरवाले मच्छिमार शासनाचे नियमांची पायमल्ली करत आहेत. शासन व मत्स्यव्यवसाय अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. स्वयंघोषित नेते काही मच्छिमारांना हाताशी धरून स्वतच्या स्वार्थाचे राजकारण करत असल्याचाही आक्षेप संघटनेने घेतला आहे. पर्ससीन मच्छिमार हा देखील पारंपारिक मच्छिमारी करत काळाची गरज ओळखून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक पगतीसाठी पुढे आला. त्यामुळे देशालाही मोठ्या पमाणात विदेशी चलन मिळवून देण्यास मदत करत असल्याचे विजय खेडेकर यांनी सांगितले. मात्र आज सर्व मच्छिमार कुटुंबे कर्जाच्या खाईत सापडली असून सर्वांना वाचवायचे असेल तर शासनाने खंबीरपणे मच्छिमारांच्या पाठींशी उभे राहणे गरजेचे असल्याचे खेडेकर यांनी मागणी केली आहे.
मच्छिमारांना आज शासनाबरोबर संघर्ष करावा लागतो आहे. दर 15 दिवसांत नवेनवे नियम लादले जात आहेत. मच्छिमार बांधवांना पुढे आणायचे की त्यांचा गळा दाबायचा हे आता शासनाने विचार करावा. आज जिवावर उदार होऊन मच्छिमार व्यवसाय केला जात असताना शासनाने त्याकडे दुर्लक्ष चालवलेले आहे. परपांतीय मच्छिमार बोटींची घुसखोरी वाढत आहे. त्यामुळे अशापकारे पर्ससीननेट मच्छिमारांवर अन्याय चालवला तर पुढच्या तीव्र लढ्यासाठी पावले उचलण्यास मच्छिमार सज्ज आहे. त्यासाठी संघर्ष करून अन्यायाविरोधात लढा देऊ असा इशारा जावेद मुकादम यांनी दिला आहे. या मच्छिमार मेळाव्याला मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव-भगिनींचीही मोठी गर्दी होती.