मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ चा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात ४ टप्प्यात दिनांक ११ एप्रिल, १८, २३ आणि २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे रोजी तर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक २७ मे २०१९ आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.
हा नियंत्रण कक्ष २७ मे,२०१९ पर्यंत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे कार्यालय, ५ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग,हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-३२, येथे २४×७ तत्वावर प्रस्थापित करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र.०२२- २२०४०४५१ आणि २२०४०४५४ असा आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.